राजकीय

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांवर टीका केल्याने एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, जयंत पाटील ठरताहेत धनगर समाजाचे खलनायक

टीम लय भारी

मुंबई : गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांना भाजपने आमदारकी दिल्यामुळे एकनाथ खडसेंनी पडळकरांवर जोरदार टीका करायला सुरूवात केली. दुसऱ्या बाजूला शशिकांत शिंदे यांनी पडळकरांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदवला. जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील खुन्नस पडळकरांवर काढायला सुरूवात केली आहे.

पडळकरांविरोधात या तिन्ही नेत्यांनी दंड थोपटले. पण आता तिघांविषयी सुद्धा धनगर समाजामध्ये संताप पसरला आहे. सोशल मीडियातून या तिन्ही नेत्यांविषयी धनगर समाजातील लोक टीका करीत आहेत.

अनपेक्षितपणे भाजपने पडळकर ( Gopichand Padalkar ) यांना आमदार बनविले. त्यामुळे धनगर समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांनी पडळकरांवर जोरदार टीका करायला सुरूवात केली. हे कमी म्हणूनही की काय, शशिकांत शिंदे यांनीही गोपीचंद पडळकर यांचा अर्ज रद्द करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदविला.

जयंत पाटील यांच्या सांगण्यावरून शशिकांत शिंदेंनी हा आक्षेप नोंदविल्याचे धनगर समाजातील सूत्रांचे म्हणणे आहे. इस्लामपूरमध्ये ‘कोरोना’ची समस्या असतानाही जयंत पाटील केवळ गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांचा अर्ज बाद करण्यासाठी मुंबईला आल्याचा आरोप धनगर समाजातून करण्यात येत आहे.

पडळकरांविषयी कटकारस्थान रचल्यामुळे खडसे, जयंत पाटील व शशिकांत शिंदे यांच्याविरोधात धनगर समाजात संताप पसरला आहे. फेसबुक व वॉट्सअपवर या तिघांविरोधात तीव्र टीका करण्यात येत आहे.

जयंत पाटील, खडसे व शिंदे प्रस्थापित आहेत. राजकीय कारणांपुरते हे नेते बहुजनांविषयी कळवळा व्यक्त करतात. परंतु संघर्ष करून पुढे आलेल्या गोपीचंद पडळकरांसारख्या ( Gopichand Padalkar ) बहुजन कार्यकर्त्याला संपविण्यासाठी हे नेते आकाशपाताळ एक करीत आहेत.

धनगर समाजातील होतकरू तरूणांना पुढे येऊ द्यायचे नाही हा छुपा अजेंडा प्रस्थापित राजकारण्यांचा आहे. त्यातूनच पडळकरांच्या ( Gopichand Padalkar ) विरोधात कारस्थाने केली जात असल्याचा आरोप धनगर समाजातून करण्यात येत असल्याचा आरोप या सूत्रांनी केला आहे.

विशेष म्हणजे, जयंत पाटील व गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय संघर्ष धनगर समाजाला अनेक वर्षांपासून ठाऊक आहे. पण आता खडसे व शशिकांत शिंदे यांनीही धनगर समाजाची नाराजी ओढवून घेतली आहे. जयंत पाटील यांच्यासह खडसे व शिंदेही धनगर समाजात खलनायक ठरल्याची भावना या कार्यकर्त्याने व्यक्त केली.

सध्यस्थितीत गोपीचंद पडळकर हे धनगर समाजातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. यापूर्वी महादेव जानकर यांची धनगर समाजात मोठी लोकप्रियता होती. परंतु जानकर यांनी धनगर समाजाच्याच विरोधात सतत विधाने केली. त्यामुळे जानकर यांच्याविषयी धनगरांमध्ये सध्या तरी नाराजी आहे.

दुसऱ्या बाजूला गोपीचंद पडळकर यांच्यामधील प्रभावी वर्क्तृत्व, हजारो – लाखो लोकांच्या सभा घेण्याचे कौशल्य, रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलने करण्याची क्षमता या गुणांमुळे ते धनगर समाजामध्ये लोकप्रिय आहेत.

पडळकर यांच्या या लोकप्रियतेचा फायदा उचलण्यासाठीच देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील या दोन्ही नेत्यांनी पडळकर यांना थेट आमदार बनविले असल्याचा दावा या सूत्रांनी व्यक्त केला.

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

KhadseVsFadanvis : गोपीचंद पडळकरांची उमेदवारी, अन् एकनाथ खडसेंचा तिळपापड

गोपीचंद पडळकरांमुळे महादेव जानकरांची पंचाईत

Politics In BJP : राम शिंदेंचा पंकजाताई, चंद्रकांतदादांवर निशाणा

Mumbai: Gopichand Padalkar reconciles with BJP

तुषार खरात

Recent Posts

नाशिकचा तापमानाचा पारा 41.8 अंशांवर

नाशिकमध्ये सलग चौथ्या दिवशी तापमानाचा (Temperature) पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने रहिवाशांमध्ये अस्वस्थता वाढली…

7 hours ago

मुंढेगावजवळ विहिरीत आढळला मायलेकींचा मृतदेह

मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीजवळ असलेल्या शासकीय आश्रमशाळेच्या परिसरातील एका विहिरीत २३ वर्षीय विवाहित महिलेसह तिच्या…

7 hours ago

विमा प्रतिनिधीनेच घातला ठेवीदारांना करोडोंचा गंडा

विमा प्रतिनिधीनेच ठेवीदारांना करोडोंचा गंडा (duped) घातल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधील मनमाड येथे घडला आहे. युनियन…

8 hours ago

राहुल गांधींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून गदारोळ, भाजपनेही साधला जोरदार निशाना

भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी लष्कराचा अपमान केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)…

8 hours ago

देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याबाबतचे निर्देश

पुण्यामध्ये (Pune Porsche Accident) शनिवारी रात्री महागडी पोर्श गाडी बेदरकारपणे चालवून अल्पवयीन चालकाने अनिश अवधिया…

10 hours ago

आठ वर्षीय बालिकेचे अपहरण व खुनाप्रकरणी दोघांना अटक

मालेगाव तालुक्यातील अजंग येथील आठ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण व खून प्रकरणाचा ( kidnapping and…

10 hours ago