राजकीय

महाविकास आघाडीत बिघाडी शक्य नाही : हेमंत पाटील

टीम लय भारी 

मुंबई: सध्या महाराष्ट्रात तीन पक्षाचे सरकार आहे. हे सरकार पाच वर्षे टिकुन राहील भाजपने कितीही प्रयत्न पाडण्याचे केले. महाविकास आघाडी सरकार शरद पवारांच्या आशिर्वाद सुरळीत चालत आहे. इंडिया अगेंस्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील (Hemant Patil) म्हणतात की,  जेष्ठ वकील सदावर्ते यांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओक वर हल्ला करण्यासाठी एसटी कामगारांना चितावणी दिली नसती तर त्यांच्या वर कायदेशीर कारवाई झाली नसती. Hemant Patil not possible to fail in Mahavikas alliance

राणा दांपत्य यांनी हनुमान चालीसी आपल्या मतदारसंघात म्हणायला पाहिजे होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर म्हणणे अयोग्य होते. यामुळे समाजासमाजात तेढ निर्माण होऊन जातीय दंगली होणार, असेल तर राणा दांपत्यावर कारवाई योग्य आहे. भाजपाचे किरीट सोमय्या यांच्यावर दगडफेक योग्य नाही. शिवसेनेच्या कार्यकर्त्या वर पण पोलीस कारवाई करणं गरजेचे आहे. अनिल देशमुख व नवाब मलिक यांच्यावर सुडबुदधीने ईडी सीबीआय ने अटक केली आहे.ती अयोग्य आहे.

भाजपा व महाविकास आघाडीत जे राजकारण घडत आहे, ते सत्तेसाठी घडत आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनतेला काहीच फायदा होणार नाही. पुढील काळात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार हे महाराष्ट्रातील राजकारण हाताळणार आहेत. तेच पुढील मुख्यमंत्री ठरवणार आहेत भाजपाने हातघाई करु नये. राजपाल कोशारी हे भाजपाचे नेते आहेत त्यांनी एकतर्फी राजकारण करु नये महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट शक्य नाही.

भाजपा व मनसे  कायदा व सुव्यवस्थेबाबत गढुळ राजकारण करत आहेत. त्याचा काहीच फायदा पुढील निवडणुकीत होणार नाही असे हेमंत पाटील यांनी म्हटले आहे.जनता हुशार आहे जनतेला कोण काय करते हे माहीत असते. भाजपाने राष्ट्रीय राजकारण करावे महाराष्ट्रात ढवळा ढवळ करु नये असे हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा: 

नितीन गडकरींचा भ्रष्टाचार बाहेर काढणार : हेमंत पाटलांचा इशारा

ICSE English Literature Semester 2 2022: Class 10th English Literature Paper moderate, see exam review here

Shweta Chande

Recent Posts

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

12 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

13 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

13 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

13 hours ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

19 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

20 hours ago