भाजपचे हिंदुत्व मनुवादी; शिवसेनेचे धर्मनिरपेक्ष – प्रा. जोगेंद्र कवाडे

लयभारी नेटवर्क

औरंगाबाद : पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्रं सोडलं. भाजपचे हिंदुत्व हे मनुवादी असून शिवसेनेचे हिंदुत्व हे धर्मनिरपेक्ष असल्याचे मत प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त प्रा. कवाडे औरंगाबाद येथे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकार, मंत्रीपद आणि ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर बोलताना  भाजपवर जोरदार टीका केली. भाजपचा नेता छत्रपती शिवरायांचा अपमान करतो त्याबाबत भाजपा गप्प राहते. त्या नेत्यावर कोँणतीही कारवाई होत नाही. तो पुस्तकही माघारी घेत नाही. त्यामुळे भाजपाचा दुटप्पीपणा समोर आला आहे. असं प्रा. कवाडे म्हणाले.

जाहिरात

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेसोबत घरोबा करुन सरकार स्थापन केलं याबाबत प्रा. कवाडे म्हणाले की, भाजपच हिंदुत्व मनुवादी असून मनुवादी हिंदुत्व हे समानता, धर्मनिरपेक्षता हे मूल्यं नाकारत असल्याचे त्यांनी सांगितले. तर, शिवसेनेचे हिंदुत्व हे भाजपच्या हिंदुत्वापेक्षा वेगळे आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वात धर्मनिरपेक्षतेचे मूल्य आहे. प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा शिवसेनेकडे असल्याचे त्यांनी सांगितले.

भविष्यात मंडळात स्थान मिळेल आशा जिवंत आहे…

मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, याबाबत प्रा. कवाडे यांनी हे आघाडीचे सरकार आहे. मित्रपक्षांना सन्मानपूर्वक वाटा मिळेल, अशी अपेक्षा होती पण ती पूर्ण न झाल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. पुढे विस्तार होईल, आशा जिवंत आहे, असे सुचक विधानही त्यांनी केले.

शरद पवार शेतकऱ्यांचे जाणता राजा…

शरद पवार यांना जाणता राजा म्हटलं तर कसं चालतं? असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानाबाबत विचारले असता प्रा. कवाडे यांनी थेट उत्तर न देता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी केलेल्या कामामुळे त्यांना शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणतात, असे नमूद केले.

राजीक खान

Recent Posts

सेक्स टेप प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस

जेडीएसचे नेते प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेवण्णा यांच्या सेक्स टेप…

28 mins ago

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

13 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

14 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

14 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

14 hours ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

20 hours ago