Lok Sabha Elecation : आम्ही लोकसभा निवडणुकीत किमान ‘इतक्या’ जागा जिंकू, फडणवीसांनी सांगितला आकडा

“गेल्या 2 निवडणुकांमध्ये आम्ही लोकसभेच्या 48 पैकी 42 जागा जिंकलेल्या होत्या. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये या आकड्यापेक्षा पुढेच जाऊ, पण खाली येणार नाही. आम्हाला जर पुढे जायचं असेल, तर मेहनत करावेच लागणार आहे”, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीदरम्यान मांडले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आगामी लोकसभा निडणुकीत किती जागा मिळणार, असा प्रश्न विचारण्यात आला होता, त्यांवर त्यांनी उत्तर दिलं की, “आगामी  लोकसभा निवडणुकीत आमच्यासमोर आव्हानच नाही, असे मी म्हणणार नाही. पण गेल्या दोन निवडणुकांमध्ये आम्ही जितक्या जागा जिंकल्या आहेत, त्याच्यापेक्षा कमी जागा आम्हाला मिळणार नाहीत. आम्ही गेलो तर पुढेच जाऊ पण आमचा महाराष्ट्रातील लोकसभा जागांचा आकडा खाली येणार नाही”, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

मला हवा तसा अजेंडा चालवू शकतो : फडणवीस

“मी सध्या उपमुख्यमंत्री असलो तरी मला हवा तो अजेंडा चालवू शकतो. प्रत्येक सरकारची एक काम करण्याची पद्धत असते. पूर्वीच्या सरकारमध्ये मी मुख्यमंत्री होतो. त्यावेळी माझे अधिकार आणि काम करण्याची क्षमता वेगळी असते. आता मी उपमुख्यमंत्री असलो तरी पूर्वी जो अजेंडा चालवत होतो, तोच चालवू शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधीही मी हातात घेतलेल्या कामाला सहकार्य करतात. माझे अधिकार उपमुख्यमंत्र्यांचे आहेत पण मी मला हवे ते काम करु शकतो”, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

…शेवटच्या क्षणी शरद पवार मागे हटले

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांच्याशी झालेल्या राजकीय वाटाघाटींचा प्रसंग पुन्हा एकदा सांगितला. त्यावेळी आम्ही शरद पवार यांच्याशी बोलणी केली होती. त्यांनी युतीसाठी होकार दिला होता. शरद पवार यांनी नंतर अजित पवारांना वाटाघाटीसाठी बोलावले. अजित पवारांसोबत बोलणी फायनल झाली, त्याला शरद पवारांनी मंजुरी दिली. पण सवयीनुसार शरद पवार शेवटच्या क्षणी मागे हटले.

मला पुढे करुन तुम्ही सगळं ठरवलं आणि आता ऐनवेळी मागे हटताय, हे अजित पवारांना आवडले नाही. मी भाजपशी विश्वासघात करु शकत नाही, असे त्यांनी शरद पवारांना सांगितले आणि ते आमच्यासोबत आले. राष्ट्रवादीच्या इतर आमदारांनाही आमच्यासोबत यायचे होते. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ती युती टिकवता आली नाही. त्यामुळे मी मुख्यमंत्री पदावरुन विरोधी पक्षनेता झालो.

हेही वाचा : Lok Sabha Elecation : अमित ठाकरे लढविणार पुणे लोकसभा निवडणूक?

टीम लय भारी

Recent Posts

‘मराठी भाषेचे सीमोल्लंघन व्हावे’, सत्यजित तांबेंची CM एकनाथ शिंदे यांना विनंती

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी…

1 day ago

उपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा

7 सप्टेंबर 2024 हा दिवस भारत देशात खूप महत्वाचा मानला जाणारा आहे. याच दिवशी आपले…

1 day ago

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या आपल्या त्वचेची काळजी

पावसाळा सुरु झाला असून, गर्मीमुळे काही सुटका झाली नाही. आता सुद्धा खूप जास्त गर्मी होत…

2 days ago

Ajit Pawar | अजित पवारांना सोम्यागोम्याच्या टपल्या

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(BJP workers publicly expressed their displeasure).…

2 days ago

Ajit Pawar | Pankaja Munde | पंकजा मुंडेंसमोर भाजप कार्यकर्त्यांचा संताप, अजित पवारांसाठी डोकेदुखी

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(Anger of BJP workers in front…

2 days ago

Sharad Pawar यांनी सांगितले, रामशेठ ठाकूर यांचे १०० कोटींचे महात्म्य ! Ramsheth Thakur

शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व…

2 days ago