राजकीय

खासदार इम्तियाज जलील यांची सरकारला ऑफर, मुस्लिम आरक्षण दिलं तर महापालिका निवडणुका लढणार नाही!

औरंगाबादः आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच पेटला आहे. मुंबईत मोठी सभा घेतल्यानंतर आज औरंगाबादमध्ये खासदार इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा सरकारसमोर आरक्षणाची मागणी केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी मोठी ऑफर दिली(Imtiaz Jalil’s offer to the government)

सरकारने मुस्लिम समाजाला आरक्षण दिले तर आम्ही राज्यभरात कुठेही महापालिका निवडणूक लढवणार नाहीत, अशी घोषणाच त्यांनी केली. आता या घोषणेचे पडसाद राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर कसे पडू शकतात, यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

अभाविपच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनावर जितेंद्र आव्हाड म्हणाले…

‘कोस्टल रोडमध्ये कुठलीही अफरातफर नाही’

मुस्लिम आरक्षणासाठी आक्रमक, मुख्यमंत्र्यांना पत्र

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात, अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. तसेच महाराष्ट्रातील वक्फ मालमत्तेचे संरक्षण व महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाला विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करून प्रलंबित मागण्या सोडवण्यात येण्याचीही मागणी या पत्राद्वारे केली.

मुस्लिम समाजाला त्वरीत 5 टक्के आरक्षण, मराठा आरक्षणाच्या धर्तीवर मुस्लिम समाजाच्या सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय नोकरीसाठी विधानसभेत त्वरीत कायदा मंजूर करण्यात यावा, मुस्लिम समाजाच्या विकासासाठी दरवर्षी शंभर कोटींची आर्थिक तरतूद करण्यात यावी, वक्फ मंडळाला अद्ययावत करण्यासाठी दरवर्षी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी आदी 8 मागण्या या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना करण्यात आल्या आहेत.

जैवविविधता जपून ठाकरेंचे स्मारक उभारावे : मुंबई उच्च न्यायालय

Mumbai: Despite Section 144 in place, AIMIM chief Asaduddin Owaisi, MP Imtiyaz Jaleel address Tiranga rally in Chandiwali Sanjay Jog

हिवाळी अधिवेशनावेळी मोर्चा काढणार

आगामी हिवाळी अधिवेशनात मुस्लिम आरक्षणावरून राज्य सरकारला घेरणार असल्याचे संकेत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिले. हिवाळी अधिवेशनात मुस्लिम समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी अधिवेशनाबाहेर मोर्चा काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

टीम लय भारी

Share
Published by
टीम लय भारी

Recent Posts

पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान

पुण्यात भर दिवसा बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात (gold shop) सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली…

3 mins ago

काँग्रेसने मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कायमच विरोध केला; के. लक्ष्मण यांचा हल्लाबोल

मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…

58 mins ago

दिव्यांग सशक्तीकरणासाठी मोदींच्या हमीवर विश्वास; विकास शर्मा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या निर्णयांमुळे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी (Divyangs empowerment) मोठी मदत…

2 hours ago

संविधाना संदर्भात वारंवार कॉग्रेस कडून जनतेची दिशाभुल – माजी मंत्री दिलीप कांबळे

गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…

2 hours ago

मतदान हे देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी करा – मंत्री छगन भुजबळ

मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…

2 hours ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…

3 hours ago