राजकीय

दोन पडेल पैलवान, मतदार कुणाला घडवणार अद्दल ?

सातारा लोकसभा मतदारसंघातील या वेळची निवडणूक सुद्धा जोरदार रंगतदार होणार असं दिसतंय(It seems that this election in Satara Lok Sabha Constituency will also be very colorfull). भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात जोरदार टक्कर होईल असे दिसते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती आणि त्यात ते विजयीसुद्धा झाले होते पण सहा महिन्यातच त्यांचे मन परिवर्तन झालं आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्ष बदलामुळे उदयनराजेंनी त्यावेळी खासदारकीचा राजीनामा दिला होता, त्या वेळच्या विधानसभेच्या सार्वजनिक निवडणुकांसोबत सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक सुद्धा घेण्यात आली होती. त्यावेळी उदयनराजे यांच्या विरोधात निवृत्त आयएएस अधिकारी श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवली होती अर्थातच ते राष्ट्रवादीचे उमेदवार होते. या निवडणुकीच्या वेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोरेगाव मतदार संघातून शशिकांत शिंदे निवडणूक लढवीत होते त्यावेळी सर्वांनाच वाटलं होतं की, उदयनराजे व शशिकांत शिंदे या दोघांचाही सहजपणे विजय होईल कारण दोघेही मातब्बर नेते होते उदयनराजेंच्या विरोधात असलेले श्रीनिवास पाटील हे तसे कमी ताकदीचे उमेदवार होते. शशिकांत शिंदे यांच्या विरोधात असलेले महेश शिंदे हे तर फारच नवखे होते , त्यामुळे श्रीनिवास पाटील व महेश शिंदे निवडून येतील असे त्यावेळी कोणालाच वाटलं नव्हतं.
पण लोकशाहीची किमया बघा, मतदारांनी उदयनराजे व शशिकांत शिंदे या दोघाही बलाढ्य उमेदवारांना पराभूत  केलं फरक इतकाच उदयनराजे लोकसभा हरले होते आणि शशिकांत शिंदे विधानसभा हरले होते.
त्या वेळच्या प्रचारामध्ये शरद पवार यांनी भर पावसात भाषण ठोकलं होतं त्या भाषणामुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये सहानुभूतीची लाट आली होती. या लाटेत उदयनराजेंचा पराभव झाला कोणालाही वाटलं नव्हतं तरीही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे त्यावेळी विधानसभेत 54आमदार निवडून आले पण आश्चर्य म्हणजे ज्या मतदारांनी उदयनराजेंना हरवलं, त्याच मतदारांनी शशिकांत शिंदे नाही हरवलं गंमत बघा कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर एकाच दिवशी आणि एकाच वेळी लोकसभा व विधानसभा अशा दोन निवडणुकांसाठी ईव्हीएम ठेवण्यात आली होती . म्हणजे ज्या मतदाराने उदयनराजेंच्या विरोधात श्रीनिवास पाटील यांच्या घड्याळ चिन्हाला मत दिले त्याच मतदाराने त्याचवेळी शशिकांत शिंदे यांच्या घड्याळाला मतदान दिले नाही एक मत घड्याळाला आणि दुसरे मत धनुष्यबाणाला असा गेम मतदारांनी केला म्हणूनच कोरेगावच्या मतदारांचा कौतुक केलं पाहिजे त्यांनी विचार करून योग्य पात्रतेचा उमेदवार कसा निवडावा याचा आदर्श वस्तू पाठ अख्ख्या महाराष्ट्रासमोर व देशासमोर घालून दिला. आम्ही मतदार कोणाचे गुलाम नाही योग्य पात्रतेचा माणूस कसा निवडावा याची आम्हास अक्कल आहे ,असाच संदेश कोरेगाव मधील मतदारांनी आपल्या लोकशाही राष्ट्राला दिला होता. काळाचा महिमा बघा गेल्यावेळी एकाच दिवशी एकाच वेळी पराभूत झालेले उदयनराजे व शशिकांत शिंदे आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत आमने-सामने आले आहेत . थोडक्यात दोन पडेल पहिलवान कुस्तीच्या आखाड्यात उतरले आहेत. उदयनराजे व शशिकांत शिंदे या दोघांनाही जनतेने नाकारलं होतं पण या दोघांनाही जनतेच्या माथी मारण्याचं काम भाजप व राष्ट्रवादीने केलं आहे. उदयनराजे व शशिकांत शिंदे या दोघांचा मागच्या वेळी का पराभव झाला होता , जनतेने या दोघांना एकाच वेळी एका दिवशी का धडा शिकवला होता, याचाही एक स्वतंत्र व्हिडिओ आम्ही लवकरच तुम्हास दाखवणार आहोत . मागच्या वेळी या दोघांना जनतेने अद्दल घडवली होती ,आता यावेळी या दोघांपैकी जनता कोणाला तारणार व कोणाला बुडवणार याकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं आहे.

तुषार खरात

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

15 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

15 hours ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

17 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

20 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

20 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

23 hours ago