राजकीय

जयंत पाटील आणि धनंजय मुंडेंचा कामाचा सपाटा, रात्री १०:३० वाजता घेतली जलसंपदा विभागाची बैठक

टीम लय भारी

बीड : राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बीड येथील पूरग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे देखील होते. पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त ते बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान सर्वांनाच त्या दोघांच्या कामाचा सपाटा पाहायला मिळाला आहे (Jayant Patil and Dhananjay Munde inspected the flood affected areas in Marathwada).

बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जयंत पाटील आणि धनंजय मुंडेंनी चक्क रात्री १०.३० वाजता जलसंपदा विभागाची बैठक घेतली. बैठकीत जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यातील जलप्रकल्प, त्यांची सुरु किंवा प्रस्तावित असलेली दुरुस्ती व इतर कामे या विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच लोकप्रतिनिधींच्या मागण्या यांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. या बैठकी दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेंनी जयंत पाटलांचे आभार मानले.

Jayant Patil : कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती; जयंत पाटील म्हणतात, “हा तर देशातील शेतकऱ्यांना…”

शरद पवारांसमोर धनंजय मुंडेंचे ‘आयएएस’स्टाईल प्रेझेंटेशन; उद्धव ठाकरे म्हणाले, तगडा मंत्री !

मागील काही दिवसांपासून मराठवाड्यातील काही भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले तर, अनेक गावांमध्ये पावसाचे पाणी शिरले. जयंत पाटील यांनी बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला तर, धनंजय मुंडेंनी पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष भेट देत मदत कार्य सुरु केले.

Jayant Patil : जयंत पाटील मुंबईवरून इस्लामपुरला परतले, अन् कार्यकर्ते भावनिक झाले

NCP, Congress, AAP seek action against BJP MLA for ‘using objectionable language against PMC officer’

मात्र या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून जयंत पाटील आणि धनंजय मुंडेंच्या कामाचा सपाटा पाहायला मिळाला. दोन्ही मंत्र्यांचा सकाळी ९ वाजता सुरु झालेला प्रवास पहाटे ३ वाजता संपला.

कीर्ती घाग

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

4 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

4 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

4 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago