33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रJayant Patil : जयंत पाटील मुंबईवरून इस्लामपुरला परतले, अन् कार्यकर्ते भावनिक झाले

Jayant Patil : जयंत पाटील मुंबईवरून इस्लामपुरला परतले, अन् कार्यकर्ते भावनिक झाले

विनोद मोहिते : टीम लय भारी

इस्लामपूर : पहिल्यांदा जितेंद्र आव्हाड, अन् त्यानंतर अशोक चव्हाण यांना ‘कोरोना’ची लागण झाली. त्यामुळे जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Jayant Patil ) यांचे कार्यकर्तेही चिंतते पडले आहेत. साहेब, तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. मुंबईत स्वतःला जपा असा भावनिक सल्ला ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पाटील यांना दिला.

जयंत पाटील ( Jayant Patil ) बरेच दिवस मुंबईत होते. सोमवारी ते इस्लामपुरला परतले. त्यावर ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पाटील यांची यांची भेट घेतली. ‘कोरोना’पासून सावध राहण्याचा सल्ला या ज्येष्ठांनी पाटील यांना दिला.

Mahavikas Aghadi

महाआघाडी सरकार सामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेईल. सरकार ‘कोरोना’च्या संकटाला निश्चित सामोरे जाईल असा विश्वासही या जेष्ठांनी व्यक्त केला.

‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत मुंबईत राजकीय पटलावर सर्वच पातळीवर अग्रेसर असणारे जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Jayant Patil ) हे वीस – बावीस दिवसानंतर प्रथमच इस्लामपूरला आले.

सोमवारी सकाळी राजारामबापू पाटील कारखाना कार्यस्थळावर त्यांच्या निवासस्थानी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी संवाद साधला. येथे कार्यालयाच्या बाहेर सॅनिटायझरच्या मशीन वर सॅनिटायझरच्या फवारणी करून प्रत्येक कार्यकर्ता जयंत पाटील ( Jayant Patil ) यांना भेटीसाठी जात होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मास्क होता. आपल्या नेत्याला भेटण्यासाठी अनेक जण आतुर होते.

कार्यकर्त्यांनी आपली नावे नोंदवून कामाचा तपशील दिला. प्राधान्यक्रमाने मंत्री पाटील ( Jayant Patil ) यांनी संवाद साधला. आपल्या नेत्याशी संवाद साधताना विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांना निवेदनही दिली जात होती. सोशल डिस्टन्सचा वापर करत काही शिष्टमंडळांनी आणि व्यक्तिगत कार्यकर्त्यांनी मंत्री पाटील यांच्याशी संवाद साधला.

तालुक्यातील काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनीही हजेरी लावली होती. इस्लामपुरातील कोरोना रोखण्यासाठी झालेले प्रयत्न, पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेत असलेल्या भूमिकेबद्दल अनेक कार्यकर्ते आपल्या साहेबांचे अभिनंदन करायलाही विसरले नाहीत. साहेब, तुम्ही पुढाकार घेतला म्हणून म्हणून इस्लामपूर शहर कोरोना  रुग्ण मुक्त झाले, याबद्दल अनेक सामाजिक संस्था प्रतिनिधींनी साहेबांचे आभार मानले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात रुग्ण संख्या वाढत असताना धोकादायक आणि भीतीचे वातावरण तयार झाले आहे. आपल्या नेत्याने ( Jayant Patil ) आरोग्यासाठी दक्ष असायला हवे अशी अपेक्षा जेष्ठ व्यक्तीच्या बरोबरीने तरुण कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

आपल्या नेहमीच्या कार्यशैलीत त्यांनी निवेदने स्विकाली. गरजेनुसार तातडीने काही अधिकाऱ्यांना फोन करून लोकांचे प्रश्न सोडविण्यास त्यांनी मदत केली.

या दरम्यान तालुक्यातील काही संस्थांच्या प्रतिनिधींनी मंत्री जयंत पाटील ( Jayant Patil ) यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदतीचे धनादेश दिले. याची रक्कम साधारण दहा लाखांच्या दरम्यान होती.

हे सुद्धा वाचा

Bhagat Singh Koshyari : राज्यपालांनी मोदी सरकारच्या सुचना बसविल्या धाब्यावर

Sharad Pawar meets Uddhav Thackeray : शरद पवार मातोश्रीवर, राजकीय वर्तुळात खळबळ

Ajit Pawar : अजितदादांकडे हसन मुश्रीफांनी आग्रह धरला, अन् लोकहिताची योजना अंमलात आली

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी