राजकीय

शिवसेना आमदारावर जितेंद्र आव्हाड संतापले; म्हणाले तुमचा मेंदू कुठे आहे ते तपासा

टीम लय भारी

मुंबई: तुमचा मेंदू कुठे आहे हे तपासून पाहिल्यास बरं होईल, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना आमदार महेश शिंदे यांना लगावला आहे. आव्हाडांनी कठोर शब्दात टीका केली. तुमचा मेंदू कुठे आहे हे तपासून घ्या असा खोचक सल्लाही आव्हाड यांनी दिला.( Jitendra Awhad get angry on Shiv Sena MLA)

कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रयत शिक्षण संस्था आणि शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. याच टीकेवर आता आव्हाड यांनी महेश शिदेंना उत्तर दिलंय. शिंदेंना उत्तर देताना शरद पवारांमुळे रयत शिक्षण संस्था आत गावागावांमध्ये पोहचल्याचं आव्हाड म्हणालेत. इतकच नाही तर शिवसेनेच्या या आमदाराला तुमचा मेंदू कुठे आहे हे तपासून घ्या असा खोचक सल्लाही आव्हाड यांनी दिलाय.

राष्ट्रवादी ३ राज्यांच्या निवडणुका लढणार,शरद पवारांची माहिती

सर्वच महामंडळाच्या मंजूर निधीचे तातडीने वितरण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

 “तुमचा मेंदू कुठे आहे हे तपासून पाहिल्यास बरं होईल,” असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. विशेष म्हणजे आव्हाड यांनी हा टोला एका आमदाराला लागवला आहे. त्यातही हा आमदार विरोधी पक्षाचा नसून सध्या राज्यात ज्या शिवसेनेसोबत राष्ट्रवादी सत्तेत आहे त्याच पक्षाच्या आमदारावर आव्हाडांनी कठोर शब्दात टीका केलीय. आव्हाड यांनी हा सल्ला ज्या आमदाराला दिलाय त्या आमदाराचे नाव आहे, महेश शिंदे.

कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रयत शिक्षण संस्था आणि शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. याच टीकेवर आता आव्हाड यांनी महेश शिदेंना उत्तर दिलंय. शिंदेंना उत्तर देताना शरद पवारांमुळे रयत शिक्षण संस्था आत गावागावांमध्ये पोहचल्याचं आव्हाड म्हणालेत. इतकच नाही तर शिवसेनेच्या या आमदाराला तुमचा मेंदू कुठे आहे हे तपासून घ्या असा खोचक सल्लाही आव्हाड यांनी दिलाय.

‘देवेंद्र फडणवीस गोव्यात गेले, अन् भाजप फुटला’

Thane: Protest outside Jitendra Awhad’s residence over OBC remarks

 बारामतीचा उल्लेख करत केलेली टीका

“रयत शिक्षण संस्थेचे खासगीकरण होता कामा नये. ज्या लोकांची पात्रता नाही त्या लोकांना रयतच्या कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून घेतलं जातं. याचे दुःख वाटते. रयतला देणगी दिली म्हणून मालकी दाखवणं चुकीचं आहे. आज रयतमध्ये नोकरी लावण्यासाठी खुलेपणाने पैसे मागितले जातात. बारामतीच्या एकाच व्यक्तीला रयतेचे काम दिले जात असल्याने संशयाचे वातावरण निर्माण होत आहे,” असंही महेश शिंदे म्हणाले होते.

 शरद पवारांनी वंशपरंपरागतीने पुढील पिढीला रयतचे अध्यक्षपद दिलं, तर रयत संस्थेसाठी फार मोठा धोका निर्माण होईल. ज्यांना समाजातील कसलीच जाण नाही अशांना या संस्थेवर घेतले. त्यामुळे जनतेचा विचार करून शरद पवार रयतचे अध्यक्षपद सोडतील,” अशी खोचक टीकाही शिंदे यांनी केलीय. “एकाच परिवारातील ९ जण रयत संस्थेमध्ये कार्यकारिणीत आहेत. त्यांचे रयतसाठी योगदान काय?” असा सवालही आमदार महेश शिंदे यांनी उपस्थित केला होता.

महेश शिंदे यांनी केलेल्या या टीकेला आता आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे. शरद पवार यांच्यामुळेच रयत शिक्षण संस्था आज तळागाळात पोहचल्याचं आव्हाड म्हणालेत. “तुम्ही शरद पवारांच्या उंचीपेक्षा केवळ दोन इंच छोटे आहात असं तुमच्या वक्तव्यामध्ये म्हटलंय. शरद पवार उंचीमुळे ओळखले जात नाहीत त्यांच्या कर्तुत्वामुळे ओळखले जातात. रयत शिक्षण संस्था ज्या उद्देशाने बनवली होती, बहुजनांच्या हितासाठी. त्याचा ज्या पद्धतीने फैलाव झाला. त्याची पाळंमुळं गाव खेड्यांपर्यंत पसरली, त्यामागे फक्त शरद पवार होते,” असं आव्हाड यांनी पवार यांचं संस्थेतील योगदान काय आहे हे सांगताना म्हटलंय.

महेश शिंदे यांना सल्ला देताना, “आपण ज्या माणसाबद्दल बोलतोय. त्याच्यासमोर आपलं कर्तुत्व कितीय हे कधीतरी तपासा. बोलायला तुम्ही फार बोलू शकता. बोलायला तुम्हाला कोण आडवणार. तुम्हाला कोणीच आडवू शकत नाही. स्वत:ची लाज स्वत:च्या हाताने घालवू नका,” असं आव्हाड म्हणालेत. तसेच, “तुम्ही उंचीने किती आहात याबद्दल माझा प्रश्न नाही. पण तुमचा मेंदू कुठे आहे हे तपासून पाहिल्यास बरं होईल,” असा खोचक टोलाही आव्हाड यांनी लगावला आहे.

Pratikesh Patil

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

2 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

2 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago