31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीय‘देवेंद्र फडणवीस गोव्यात गेले, अन् भाजप फुटला’

‘देवेंद्र फडणवीस गोव्यात गेले, अन् भाजप फुटला’

टीम लय भारी

मुंबई : देवेंद्र फडणवीस काल गोव्यात गेले. त्याच वेळी सत्ताधारी भाजपमधील एक मंत्री, आणि आमदाराने भाजपला सोडचिट्टी दिली. फडणवीस गोव्यात गेले, अन् भाजप फुटला, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चिमटा काढला. खासदार राऊत पत्रकारांशी आज बोलत होते(Devendra Fadnavis went to Goa, BJP split).

भाजपचे नेते महाराष्ट्रातून गोव्यामध्ये नोटांच्या बॅगा भरून नेत आहेत. गोव्यात नोटांचा पाऊस पाडला जात आहे. पण आमची लढाई नोटांच्या विरोधात आहे. शिवसेना त्या विरोधात लढेल. शिवसेना हा सामान्य लोकांचा, बहुजनांचा व हिंदूंचा पक्ष आहे. लोकांचा शिवसेनेवर विश्वास आहे, असे ते म्हणाले.

शिवसेनेने मोदींनाही करुन दिली मास्कची आठवण

संजय राऊत यांचे विधानसभेसाठी भाजपला आव्हान

उत्तर प्रदेशमधील एका मंत्र्याने, व पाच आमदारांनी भाजपला सोडचिट्टी दिली. उत्तर प्रदेशात सत्तांतराच्या दृष्टीने पाऊले पडत असल्याचे ते म्हणाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही खासदार राऊत यांनी चिमटा काढला. अगोदर शरद पवारांएवढी उंची अगोदर गाठा, अन् त्यांच्यावर टीका करा. शरद पवार पंतप्रधान पदापर्यंत पोचले नाहीत, म्हणून त्यांची उंची कमी होत नाही, असे राऊत म्हणाले.

अयोध्येत जमीनी घेणं म्हणजे हिंदुत्वाचा चोरबाजार;शिवसेनेचा हल्लाबोल

Maharashtra’s MVA alliance formula in Goa too? Here’s what Sanjay Raut said

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी