राजकीय

गोपीनाथ मुंडे मोठ्या मनाचा माणूस : आमदार जितेंद्र आव्हाड

टीम लय भारी

मुंबई: राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यातून आपले आणि गोपीनाथ मुंडे यांच्या अनेक आठवणी सांगितल्या आहे. राजकारणात नेते ऐकामेकांच्या विरोधात सतत आरोप प्रत्यारोप होत असतात. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय नेत्यांमध्ये मतभेद असतात वैर नसतं हे आमदार जितेंद्र आव्हाडयांच्या (jitendra awhad) पोस्टमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. jitendra awhad on gopinath munde

गोपीनाथ मुंडे यांच्याशी माझी तशी राजकीय ओळख मी राजकारणात आल्यानंतर त्यांनी श्री. शरद पवार साहेबांविरुद्ध जेव्हा आरोपांच्या फेरी झाडायला सुरुवात केली तेव्हाच झाली. मी तसा त्यांच्याशी जवळून कधी बोललो देखील नव्हतो तसेच त्यांना कधी पाहिल देखील नव्हत. परंतु ते पवार साहेबांवरती टिका करत होते म्हणून माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड राग असायचा.

1995 साली आमची सत्ता गेली. सत्ता गेल्यानंतर काही दिवसांनी मी MPSC चा अभ्यास करीत असताना माझ्या वर्गात असलेल्या माझ्या मित्राने एक पेपर माझ्या हातात आणून दिला आणि हा पेपर तुझ्या कामाचा आहे असे मला सांगितले. मी तो वाचला आणि त्यात गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल बरच काही लिहिलेलं होते. मी तो पेपर तसाच पवार साहेबांकडे गेलो आणि त्यांच्या हातात दिला. पवार साहेबांनी तो वाचला आणि ड्रॉवरमध्ये खाली फेकून दिला.

मला एवढेच म्हणाले जितेंद्र त्यांनी वार केले म्हणून आपण कमरेखाली वार केले पाहिजेत असे नाही. राजकारणात कधीही अशी भावना ठेवायची नसते. आपल्यावर आरोप केले आपण विसरुन जायच असत जनता उत्तर देते.

नंतर मी 1996 साली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो आणि नेमकी जिल्हा परिषदेची निवडणूक संपवून जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड जाहीर झाली होती. त्याच दरम्यान काँग्रेसचे काही निवडून आलेले उमेदवार ह्यांना मुंडे साहेबांनी गायब केले होते म्हणून त्यांच्या घरावर युवक काँग्रेसचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. आणि मी त्या मोर्चाचे नेतृत्व केलं. जवळ-जवळ 20 ते 25 हजार कार्यकर्ते आम्ही जमवले होते. तेव्हा ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते.

नंतर माझ्यावर एक केस पडली. सरकारी कागदपत्रांमध्ये हेराफेरी केलेल्याची ती केस होती. ती केस माझ्यावर पडली म्हणून माझे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्षपद गेले. ती केस खोटी होती हे मलाही माहिती होतं आणि ती केस टाकणा-या पोलीसांनाही माहिती होत. ती कोणी केस कोणी टाकायला लावली हे आजही मला माहिती आहे. पण, त्या माणसाच मला नाव घ्यायच नाही.

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या गोपीनाथ मुंडे साहेबांशी ते सत्तेत आले तेव्हा माझी थेट ओळखच नव्हती. केस पडल्यानंतर माझ्या सगळ्या वाटा बंद झाल्या होत्या. त्याचवेळेस माझे सासरे जाऊन गोपीनाथरावांना भेटले. गोपीनाथराव पटकन त्यांना म्हणाले ‘जितेंद्र माझ्याकडे कधी का आला नाही हे सगळ सांगायला‘ त्यानंतर त्यांनी मला आत बोलावून घेतले. आणि विचारले तु माझ्याकडे का नाही आलास. मी म्हणालो तसं नाही…. म्हणाले अरे वेडा आहेस का ?

त्यांच हे वागणं बघूनच मला लाजल्यासारखं झाल. त्यांनी लगेच त्यांचे अण्णासाहेब मिसाळ नावाच्या पीएला फोन करुन सांगितले कि, त्या केसची फाईल मागवून घ्या. तोपर्यंत त्या केसच्या चौकशीकामी अधिकारी असलेले श्री. आडे यांनी मला ह्याबाबत अगोदरच कल्पना दिली होती कि, तुमच्याविरुद्ध कुठलाही पुरावा नाही. पण, वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री. डेमला आणि श्री. झरेकर हे दोघेही माझ्यावर प्रचंड दबाव आणत आहेत कि, तुमचे नाव ह्यामध्ये कसेही करुन ओढावं. आडे यांनी या गोष्टीला साफ नकार दिला कि माझ्याकडून केस काढून घ्या. पण, मी खोटे काम करणार नाही.

अण्णासाहेब मिसाळ यांनी फाईल मागवून घेतली. खालच्या अधिका-यांना आनंद झाला. कि, ज्या अर्थी मुंडे साहेबांनी फाईल मागवून घेतली आहे, त्यामध्ये जितेंद्र आव्हाड आणि गोपिनाथ मुंडे यांचे इतके वैर आहे कि गोपिनाथ मुंडे जितेंद्र आव्हाड यांची आता वाजवून टाकणार. अण्णासाहेब मिसाळ यांनी फाईल मागविल्यानंतर सकाळी 8.30 वाजता ती फाईल घेऊन स्वत: श्री. झरेकर हे मुंडे साहेबांना भेटले. मुंडे साहेबांनी फाईल बघितली आणि सांगितले फाईल ठेवा संध्याकाळी या मी तुम्हांला काय करायचे ते सांगतो. सगळे अधिकारी खुश झाले कि, आता जितेंद्र आव्हाड यांच काही खरं नाही.

संध्याकाळी बोलाविल्यावरती त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला कि, किती पैसे घेतले सुपारी वाजवायचे. एखाद्या माणसाच राजकीय आयुष्य तो जेव्हा घडवतो, तेव्हा कितीतरी वर्षे त्यामध्ये तो त्याची चप्पल घासत असतो. हे तुम्ही कोणाच्या सांगण्यावरुन केलं. सगळे अधिकारी मान खाली घालून उभे होते. त्यांनी त्या अधिका-यांना सांगितले ही फाईल ताबडतोब मागे घ्या. आणि केस मागे घेतल्याचे मला कळवा ती फाईल तशीच बंद झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर एकेदिवशी सकाळीच फोन आला. जितेंद्र तुला विधानपरिषदेची उमेदवारी देण्याचे मी आणि प्रमोदने ठरवले आहे. तुझ काय म्हणणे असेल ते तु विचार करुन पत्नी आणि सास-यांशी बोलून ठरवं. मी माझ्या पत्नीशी बोललो. पत्नीला सांगितले कि, मी मेलो तरी पवार साहेबांना सोडणार नाही.

माझ्यावर मुंडे साहेबांनी केलेल्या उपकाराचे ओझे होते. माझ्या पत्नीने त्यांना दोन तासांनी फोन केला आणि म्हणाली कि, तो तुमच्याशी काही बोलणार नाही व पवार साहेबांना कधीही सोडणार नाही. तर ते हसायला लागले. म्हणाले ‘वेडा’ आणि त्यांनी फोन ठेवला. त्यानंतर त्यांनी हा विषय काढला नाही. खूप वेळा आम्ही दोघे एकमेकांना भेटलो. अतिशय प्रेमळ, खांद्यावर हात टाकून त्यांच्या भाषेत ‘काय जितेंद्र’ असे बोलून ते नेहमी मला आपलेपणाने वागवायचे.

अनेकवेळा माझी आणि त्यांची टिव्हीवरती वादविवाद आणि खडाजंगी व्हायची. आदल्या दिवशीचा वाद विवाद त्यांच्या चेहऱ्यावरती कधीही दिसायचा नाही. कायम प्रेमाने जवळ घ्यायचे. खांद्यावर हात ठेवायचे. त्यांचे उडणारे केस. कंगवा फिरवणं. स्टेजवर आल्यानंतर ते ज्या स्टाईलने जनतेकडे बघायचे. ज्या स्टाईलने खिशातून कंगवा काढायचे आणि केस मागे फिरवायचे. ती स्टाईल आजही डोळ्यासमोर आहे.

29 मे 2014 रोजी पवार साहेबांच्या आशीर्वादाने मी मंत्री पदाची शपथ घेतली. 1 तारखेला सकाळीच फोन वाजला. समोरुन आवाज आला अरे जितेंद्र अभिनंदन गोपीनाथ मुंडे बोलतोय, मंत्री झालास ना… अरे मी मंत्री झालो पण, तु माझ अभिनंदन नाही केलसं. मला लाजल्यासारख झालं. म्हणालो साहेब मी कुठे तुम्हांला फोन करु. म्हणाले तस काही नाही.

चांगल काम कर संधी मिळाली आहे. आणि फोन ठेवला आणि दोनच दिवसांनी सकाळी फोन वाजला. तारीख 3 जून. गोपिनाथराव गेले हा निरोप आला. हे ऐकून सगळा प्रवास डोळ्यासमोर आला. पवार साहेबांवरती त्यांनी केलेले हल्ले, पवार साहेबांनी माझ्या हातातून घेतलेला कागद, आपण कमरेखाली वार करायचा नाही हा दिलेला संदेश, माझी केस, मुंडे साहेबांच्या मनाचा मोठेपणा. हे सगळं आजही आठवलं कि डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही. ते गेले याच्यावर आजही माझाला विश्वास बसत नाही. परत सांगतो एवढ्या मोठ्या मनाच्या माणसांची आज महाराष्ट्राला सर्वाधिक गरज आहे.

गोपिनाथराव अमर रहे..!

हे सुद्धा वाचा:

‘पुण्यश्लोक मातेचा उल्लेख महाराणी अथवा राजमाता करु नका असे सुचविले तर एवढ्या मिरच्या लागायचे कारण काय ?’

Sidhu Moosewala murder: Parents of slain singer to meet Amit Shah today in Chandigarh

Shweta Chande

Recent Posts

बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी टोइंग कारवाईला सुरुवात

शहरात वाहनतळांची पुरेशी व्यवस्था नसताना तसेच रस्त्यांलगत अतिक्रमण कायम आहे. या समस्या जैसे थे असताना…

9 mins ago

उन्हाळ्यात ऊसाचा रस पिण्याचे फायदे

उन्हाळा सुरु झालाय तर उन्हाळ्यात आपल्याला काही न काही थंड पियायच असतं  तर त्या साठी…

1 hour ago

नाशिकच्या रस्त्यांवर धावणार 50 इलेक्ट्रिक बस

केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाकडून पीएम ई बस (PM E Bus) या योजनेंर्तग देशातील २० लाखांच्या…

4 hours ago

सेक्स टेप प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस

जेडीएसचे नेते प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेवण्णा यांच्या सेक्स टेप…

4 hours ago

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

17 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

17 hours ago