राजकीय

पावसाळ्यात दुर्घटना टळण्यासाठी प्रशासन सतर्क, १५ जूनपासून NDRF च्या नऊ तुकड्या महाराष्ट्रात दाखल होणार

टीम लय भारी

मुंबई : येत्या काही दिवसांत पावसाळ्याला सुरुवात होत आहे. १५ जूनपासून NDRF च्या नऊ तुकड्या महाराष्ट्रातील जिल्ह्यात तैनात करण्यात येत आहेत. पावसाळ्यात दुर्घटना रोखण्यासाठी प्रशासन सतर्क झालंय. तातडीने बचावकार्य करण्यासाठी या तुकड्या तैनात करण्यात आल्यात.  (NDRF Nine units will arrive in Maharashtra from June 15 in each district)

नऊ पथकांपैकी प्रत्येकी दोन पथके मुंबई आणि ठाण्यात तैनात असतील आणि प्रत्येकी एक पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तैनात असेल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिली. त्याचप्रमाणे, 15 जून ते 15 सप्टेंबर दरम्यान SDRF ची प्रत्येकी एक टीम नांदेड आणि गडचिरोली येथे तैनात केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गेल्यावर्षी आलेल्या पुरामुळे रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.याच अनुषंगाने या उद्भवलेल्या घटनेतून धडा घेत १५ जूनपासून NDRF च्या नऊ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.जिल्हाप्रशासन बचावकार्यासाठी सज्ज झाले आहे.

पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपलाय. कोकण भागात प्रत्येक जिल्ह्यात NDRF ची टीम दाखल होणार आहे.त्याच अनुषंगाने आणि पूर किंवा इतर नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी NDRF ची टीम जिल्ह्यात आली आहे.

प्रामुख्याने चिपळूनमध्ये ही टीम दाखल करण्यात आली आहे. त्याचसोबत कोल्हापूर, रायगड,सातारा,रत्नागिरी,पालघर आणि सिंधुदुर्ग या भागातही NDRF ची टीम दाखल करण्यात आली आहे.

पूरासारखी घटना परत घडू नये याकरीता एनडीआरएफच्या संपूर्ण टीमने मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात NDRF ची टीम तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.


हे सुद्धा वाचा :

 

काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा : गोपीचंद पडळकर  

शिवसेना, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार; कॉंग्रेस सतरंज्या उचलणार; मनसेचा टोला

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही , उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन

Pratiksha Pawar

Recent Posts

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

11 mins ago

सराईत गुन्हेगारांच्या 6 मित्रांची ‘तडीपारी’! पोलीस उपायुक्त चव्हाण

गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्तालयाकडून तडीपारीची (deported) कारवाई केली जाते. मात्र…

28 mins ago

नाशिक शरणपूर येथे ज्येष्ठ नागरिकाला धमकावत सायबर चोरट्यांनी उकळले सात लाख

मोबाइल क्रमांकावरुन सुरु झालेल्या बँक खात्यावर सहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार  झाल्याचे धमकावून व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी…

3 hours ago

पंकजा मुंडेंची लढाई जातीयवादाच्या पेचात

बीडची निवडणुक ही राष्ट्रीय मुद्द्यांवर कमी आणि जातियतेला धरून अधिक अशीच आता होताना दिसतेय. आरक्षण…

3 hours ago

४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा

उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde)…

3 hours ago

नाशिक इंदिरानगर येथे वॉशिंग मशिनमध्ये ठेवलेले दागिन्यांची चोरी

इंदिरानगरमध्ये (Indiranagar) चोरट्याने चक्क वॉशिंग मशिनमध्ये (washing machine) लपवून ठेवलेले सुमारे दीड लाखांचे दागिने (Jewellery…

4 hours ago