राजकीय

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली जिल्हा बंदी नोटीस म्हणजे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने करण्यात आलेल्या सूडबुद्धीचाच हा एक प्रकार आहे. त्यांच्याविरुद्धची ही नोटीस त्वरित मागे घ्यावी.तसे न झाल्यास महाविकास आघाडीला(Maha Vikas Aghadi) आंदोलन छेडावे लागेल, अशा आशयाचे निवेदन महाविकास आघाडीतर्फे (Maha Vikas Aghadi) पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना सादर करण्यात आले. सुधाकर बडगुजर (Badgujar) हे शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख आहेत.(Maha Vikas Aghadi leaders protest against action against Badgujar)

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्याचे ते स्टार प्रचारक आहेत. लोकसभा निवडणुकीसाठीचे ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या निवडणूक प्रचाराची संपूर्ण धुरा बडगुजर यांच्या खांद्यावर आहे. राजाभाऊ वाजे यांना जनतेचा मिळत असलेला पाठिंबा बघता ठाकरे गटाला नामोहरम करण्यासाठी पोलिस प्रशासनाने बडगुजर यांच्यावर केलेली कारवाई अयोग्य आहे. हद्दपारी गुन्हेगाराची अथवा नागरिकांना त्रास देणाऱ्या व्यक्तीची केली जाते.परंतु सुधाकर बडगुजर हे लोकसेवक तसेच सामाजिक कार्य करणारे व्यक्तिमत्वआहे. त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे राजकीय परिस्थिद्वारे निर्माण झालेल्या वादातील आहेत.हद्दपारीच्या नोटिसीत १ ते ४ गुन्हे दर्शविले आहेत.न्यायालयाने त्यातून बडगुजर यांची मुक्तता केली आहे. एका प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे.

एकूण १० वर्षाच्या कार्यकाळात बडगुजर यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही.सलीम कुत्ता डान्स प्रकरणी बेकायदेशीर कृत्य केल्याचा एक गुन्हा यावर्षी त्यांच्यावर दाखल झाला आहे.अशा एक गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर हद्दपारी नोटीस काढणे योग्य नाही. अनेक राजकीय व्यक्तींविरोधात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत परंतु त्यांच्यावर तशी कोणतीही कारवाई झाल्याचे निदर्शनास येत नाही.मग बडगुजर यांच्यावरच अशी कारवाई का? असा सवाल निवेदनात विचारण्यात आला आहे. यामागे राजकीय आकस हाच घटक मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे ही गोष्ट लपून राहिलेली नाही.हद्दपारची कारवाई मागे न घेतल्यास महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांतर्फे जन आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

पोलिस आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात महाविकास आघाडीचे पदाधिकारी शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महा नगरप्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गिते,.मा.आ.नितीन भोसले,गजानन शेलार, डी.जी सूर्यवंशी,संजय चव्हाण,सुरेश दौलड,बाळासाहेब कोकणे,विकास गिते,परशुराम कनकेर, विनोद नुनूसे,रुषी वर्मा, भैय्या मणियार,सुनील जाधव यांचा समावेश आहे.पोलीस आयुक्त कर्णिक यांनी याबाबत कायद्याच्या चौकटीत राहून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले.

टीम लय भारी

Recent Posts

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

2 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

2 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

3 hours ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

3 hours ago

कुटुंबीयांसमवेत मंत्री छगन भुजबळ यांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी आज…

3 hours ago

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

16 hours ago