राजकीय

दिल्लीच्या राजकारणापुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही : संजय राऊत

टीम लय भारी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला सुपर स्प्रेडर ठरवलं असल्याचं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. बुधवारी केलेल्या स्फोटक पत्रकार परिषदेनंतर संजय राऊत यांनी गुरुवारीही दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ”पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला सुपर स्प्रेडर ठरवलं. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी निषेध नाही, निदान नाराजी तरी व्यक्त करायला हवी होती,” असा घणाघात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसंच आपल्यामागे राक्षस लावले जात असल्याची टीका केली आहे(Maharashtra has never bowed down to Delhi politics : Sanjay Raut).

“या देशाचा नागरिक, संसदेचा सदस्य, शिवसेनेचा नेता आणि बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक म्हणून सत्य बाजू लोकांसमोर मांडण्याचा अधिकार आहे. जे काही बोलायचं होतं ते मी काल बोललो आहे. आता जे काही बोलायचं आहे ते मी महाराष्ट्राची राजधानी मुंबईत जाऊन बोलणार आहे,” अशी माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिली.

”किमान संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींनी तरी खोटं बोलू नये असं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी महाराष्ट्रातील भाजपा नेत्यानींही यावर चुप्पी साधणं हेच तुमचं महाराष्ट्र प्रेम आणि महाराष्ट्र बाणा आहे का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. ”छत्रपती शिवाजी महाराजांपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत आता शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील आणखी काही मोठे नेते असतील, हा महाराष्ट्राचा बाणा आहे, तो राहील,” असे राऊत म्हणाले.

राऊत म्हणाले, ”दिल्लीच्या राजकारणापुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही. म्हणून छत्रपती शिवरायांना देशाचा युगपुरुष मानला जातो. हे फक्त राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, पण बाणा आमच्याकडे आहे. सरकार पाडण्याच्या कितीही धमक्या द्या, सरकार पडणार नाही. आणि जे सरकार पाडण्याची भाषा करत आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा. शिवसेना आणि महाराष्ट्र हा अशा येऱ्यागबाळ्यांपुढे झुकणारा नाही,”

हे सुद्धा वाचा

‘मुंबईत शिवसेनेचा दरारा’, संजय राऊत यांचा ईडीविरुद्ध घणाघात

संजय राऊत यांनी व्यंकय्या नायडूंना लिहिले पत्र, म्हणाले…

संजय राऊतांच्या राज्य सरकारला कानपिचक्या, प्रत्येक मुद्यावर मी बोलण्याचा ठेका घेतला नाही

Sanjay Raut claims some people approached him to help topple Maha govt; writes to Vice President

“कोणाला गुडघे टेकायचे असतील, कोणाला महाराष्ट्राची लाज बाहेर काढायची असेल तर काढावी. काल त्यांनी तेच केलं ना…महाराष्ट्र करोनाचा सुपर स्प्रेडर? महाराष्ट्राने जगात सर्वोत्तम काम केलं. महाराष्ट्राच्या नद्यांमध्ये, समुद्रांमध्ये बेवारसपणे प्रेतं नाही फेकली. किती खोटं बोल आहात आपण. महाराष्ट्रातील भाजपाच्या एका तरी नेत्याने यावर निषेध सोडा पण साधी नाराजी तरी व्यक्त करावी. हे तुमचं महाराष्ट्रप्रेम आणि हा तुमचा महाराष्ट्र बाणा,” अशी टीका संजय राऊत यांनी केली(Maharashtra did the best job in the world).

“दिल्लीच्या दबावापुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना देशाचा युगपुरुष मानलं जातं. या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. राजकारणाची नाव घेतात ते सोडून द्या, पण बाणा आमच्याकडे आहे,” अशी टीका संजय राऊतांनी भाजपावर केली.

किरीट सोमय्या आणि इतर खासदार कोविडमधील भ्रष्टाचारासंदर्भात गृहसचिवांची भेट ङेणार आहेत. यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “त्यांना आंतरराष्ट्रीय कोर्टात जावं. मग गंगेत जी प्रेतं वाहून गेली त्यासंबंधी कोणाकडे तक्रार करायची? त्यासंबंधी हे शिष्टमंडळ कोणत्या कोर्टात जाणार आहे हे आम्हाला कळलं तर बरं होईल”.

“महाराष्ट्राची बदनामी झाली असल्याने मी तिथे जाऊनच बोलणार आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा, कमी लेखण्याचं, मराठी माणसाला अपमानित करण्याचं, मुंबईचं महत्व कमी करण्याचं जे उद्योग सुरु आहेत त्याविरोधात प्रत्येक मराठी माणसाने आणि नेत्याने निर्भयपणे बोललं पाहिजे. ही बाणेदारपणाची मशाल कोणापुढेही न झुकता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेली पाहिजे. आम्ही ती नेत असल्याने ते घाबरले आहेत. आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर विस्तार करत असल्याची त्यांना भीती आहे. त्या भयापोटी आमच्या मागे राक्षस लावले जातात. पण राक्षसाचा अंत होतो. जर हे हिंदुत्ववादी असतील तर यांना कळलं पाहिजे. राक्षसाचे कोथळे काढले जातात, वध केला जातो. त्यामुळे आम्हाला चिंता नाही. उलट मी तर उत्तेजन देतो की तुम्ही अशाप्रकारे अजून दमणचक्र करा म्हणजे महाराष्टर तुमच्याविरोधात एकवटेल,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

Team Lay Bhari

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

13 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

13 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

14 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

14 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

14 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

17 hours ago