राजकीय

महापौर किशोरी पेडणेकरांचा नारायण राणेंवर हल्लाबोल

टीम लय भारी

मुंबई : नारायण राणे यांच्या जुहूमधील अधीश बंगल्यावर अनधिकृतपणे बांधकाम केल्याचे आरोप केले होते. मुंबई महानगरपालिकेने नारायण राणेंना त्याच्या जुहूच्या बंगल्याच्या अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस पाठवली होती. बंगल्यातील काही पोर्शनमध्ये नियमांचं उल्लंघन झाल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे. तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला चांगलेच फटकारले आहे(Mayor Kishori Pednekar attacks Narayan Rane).

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नारायण राणे हे महापालिकेला सहकार्य करतील असा विश्वास आजच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.आता महापौर पेडणेकर यांनी या कारवाईवरून राणेंवर निशाणा साधला आहे. नुसत तुम्ही महानगरपालिका बघू नका. काल, परवाच केंद्राने त्यांना सीआरझेडची नोटीस दिली आहे, त्याला लक्ष द्या. केंद्रानेही सीआरझेडचे उल्लंघन झाल्याचे सांगितले आहे.

यापूर्वीदेखील त्यांना नोटीस देण्यात आली होती. त्यांच्या घरी महापालिकेचं पथकही गेलेलं आहे. केंद्र सरकारनेदेखील यापूर्वी या प्रकरणी आक्षेप नोंदवलेले आहेत. त्या म्हणाल्या, हे विरोधक महापालिकेच्या कामांवर सतत आरोप करत आहेत. कारवाईसाठी नारायण राणे यांच्या बंगल्यात महापालिका पथक दाखल झाले आहे. या प्रकरणात दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई नक्की होणार आहे. त्यामुळे कुणीही बिनबुडाचे आरोप करु नये, असे खोचकपणे टिका केली.

हे सुद्धा वाचा

विनायक राऊतांचा राणेंवर प्रतिहल्ला, लाचारी पत्करणे नारायण राणेंकडून शिकावे

मिलिंद नार्वेकरांच्या नारायण राणेंना कानपिचक्या!

नारायण राणेंच्या अनधिकृत बंगल्यावर कारवाईचे आदेश

Disha Salian case: Mumbai Mayor Kishori Pednekar slams Narayan Rane, says ‘character assassination of a woman is being done after death’

तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. हिंदुत्व हे तोंडाने बोंबलून सांगायचं नसतं. हिंदुत्व हे मानणारं हिंदुत्व आहे. देश आणि मुंबईला अस्थिर करणारं हिंदुत्व नाही. प्रत्येक धर्माचा आदर करावा हे आपल्याला आपल्या आईवडील आणि गुरुजणांनी शिकवलं आहे, अशा शब्दात महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला सुनावले आहे. महापालिकेचे अधिकारी बंगल्याची पाहणी आणि मोजणी करत आहेत. आज नारायण राणेंच्या बंगल्यावर हातोडा पडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Team Lay Bhari

Share
Published by
Team Lay Bhari

Recent Posts

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

11 hours ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

11 hours ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

12 hours ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

20 hours ago

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

1 day ago

राज्य सरकार व BMC वरच सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा: नाना पटोले

मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातातील मृत्यू हे बीएमसी प्रशासन व राज्य सरकारच्या बेपर्वाईचे बळी…

1 day ago