राजकीय

आदित्य ठाकरेंचा राणेंच्या बालेकिल्ल्यात दौरा, राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा

टीम लय भारी

सिंधुदुर्ग : शिवसेना नेते, राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे आज सिंधुदुर्ग जिह्याच्या दौऱयावर जाणार आहेत. राणे कुटुंबीयांनवर एका मागोमाग अनेक संकटे आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज राणेंच्या बालेकिल्ल्यात असतील. नितेश राणेंना झालेल्या अटकेनंतर आदित्य यांचा पहिलाच सिंधुदुर्ग दौरा आहे. त्यामुळे राजकारणात आदित्य ठाकरे काय बोलणार याकडं लक्ष लागलं आहे(Aditya Thackeray’s visit to Narayan Rane’s sindhudurg).

आदित्य ठाकरे यांचे आज दुपारी 2च्या सुमारास चिपी विमानतळावर आगमन होईल. अत्याधुनिक स्कूबा बोटीचे लोकार्पणही यावेळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या दौऱयात आदित्य ठाकरे यांच्यासह नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक आदी उपस्थित राहणार आहेत.

सिंधुदुर्गातील पर्यटनाला अधिकाधिक चालना देण्यासाठी तेथील नैसर्गिक साधनसामुग्री आणि सोयीसुविधांचा आढावा घेणार आहेत. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असून जलक्रीडा प्रकार, समुद्रकिनाऱयांचा विकास त्याचप्रमाणे कृषी, जल व अन्य पर्यटन विकासाला चालना देण्याकरता आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न आहेत. त्यादृष्टीने आदित्य ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरेंनी जमिनीवर बसून जनतेशी साधला संवाद

हिजाबच्या वादावर आदित्य ठाकरे यांचे सूचक वक्तव्य

आदित्य ठाकरे यांची सूचना, महाराष्ट्रात मास्कची सक्ती हटवली जाईल हा गैरसमज काढून टाका

Aditya Thackeray turns focus on river devp project to be inaugurated during PM’s visit; asks for presentation

एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जुहू परिसरातील अधीश या बंगल्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.महापालिकेचे अधिकारी राणेंच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामाची तपासणी आणि मोजमाप करणार आहेत. यादरम्यान नारायण राणे स्वतः जुहूतील बंगल्यावर दाखल आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतल्या जुहू इथल्या अधीश बंगल्याची पाहणी करण्यासाठी मुंबई महापालिकेचं पथक रवाना झालं आहे. राणे यांच्या बंगल्याची पाहणी करण्यासंदर्भात मुंबई महापालिकेनं याआधीच नोटीस बजावली होती.

Team Lay Bhari

Share
Published by
Team Lay Bhari

Recent Posts

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

25 mins ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

2 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

2 hours ago

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

4 hours ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

5 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

6 hours ago