राजकीय

मंत्री एकनाथ शिंदे यांनी नातवासोबत खेळली होळी !

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकले होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अनेक सेवा ठप्प झाल्या होत्या. याशिवाय संपूर्ण सणसमारंभ साजरे करण्यावर देखील निर्बंध लादण्यात आले. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच, अनेक उत्सव साजरे केले जात आहेत. दरम्यान, आज १८ मार्च रोजी धुळीवंदनाचा दिवस असून, राज्यभरात होळी सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे.

अनेक नागरिकांसह राजकीय नेतेसुद्धा धुळीवंदनाचा आनंद लुटत आहेत. दरम्यान नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदाची होळी मोठ्या उत्साहात साजरी केली आहे.एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे , नातू रुद्राश शिंदे आणि जवळची काही मंडळीसुद्धा उपस्थित होती.

एकनाथ शिंदे यांनी रंगपंचमी उत्सवाच्या निमित्ताने कुटूंबिय, मित्रपरिवार, शिवसैनिक तसेच पत्रकार मित्रांसोबत रंगाची उधळण करित सर्वांना रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. यासमयी कुटूंबातील सर्वात कनिष्ठ सदस्य रुद्रांश याचा उत्साह द्विगुणीत झाला होता.

Pratiksha Pawar

Recent Posts

काँग्रेसने मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कायमच विरोध केला; के. लक्ष्मण यांचा हल्लाबोल

मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…

16 mins ago

दिव्यांग सशक्तीकरणासाठी मोदींच्या हमीवर विश्वास; विकास शर्मा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या निर्णयांमुळे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी (Divyangs empowerment) मोठी मदत…

52 mins ago

संविधाना संदर्भात वारंवार कॉग्रेस कडून जनतेची दिशाभुल – माजी मंत्री दिलीप कांबळे

गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…

1 hour ago

मतदान हे देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी करा – मंत्री छगन भुजबळ

मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…

2 hours ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…

2 hours ago

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

17 hours ago