राजकीय

मनसेला धक्का, विदर्भातील नेते अतुल वंदिले राष्ट्रवादीच्या गळाला!

टीम लय भारी

मुंबई : मनसेला काही दिवसांपासून मोठी गळती लागली आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांच्या सोडचिठ्ठीनंतर मनसेला एकापाठोपाठ धक्के बसत आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेची ताकद कमी होताना दिसत होत. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वंदिले हे विदर्भातील ओबीसीचे नेते आहेत. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत(MNS hit by Vidarbha leader Atul Vandile enters NCP!).

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी लागले आहेत. राज ठाकरे मैदानात उतरुन निवडणुकांसाठी काम करत आहेत. पुणै दौऱ्यावर असताना मनसेच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. यानंतर मनसेमध्ये १४० हून अधिक महिला कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे(MNS president Raj Thackeray has started preparations for upcoming elections).

राज ठाकरेंनी औरंगाबाद, नाशिक आणि पुण्याचा दौरा केला आहे. तसेच विदर्भाचाही ते दौरा करणार आहेत. परंतु त्यापूर्वीच विदर्भातील मनसेचे उपाध्यक्ष अतुल बंदिले राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे. वंदिले मनगटावर घड्याळ बांधणार आहेत.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट

उदय सामंत मनसेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, अमेय खोपकरांचं उपहासात्मक ट्वीट

MVA Govt Makes Marathi Signboards Must for All Shops, Critics Say Attempt to Woo Voters for BMC Polls

मनसे नेते अतुल वंदिले हे विदर्भातील ओबीसीचे नेते आहेत. मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यालयात वंदिलेंचा पक्ष प्रवेश होणार आहे. या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत. वंदिले यांच्यासोबत एकूण ४० पदाधिकारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. यासोबतच हिंगणघाटमधील काही पदाधिकारी आणि सरपंचही मनसेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Team Lay Bhari

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

11 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

11 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

12 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

12 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

13 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

14 hours ago