31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयराज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट

राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट

टीम लय भारी

बीड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात बीडमधील परळी न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. राज ठाकरे यांना २२ ऑक्टोबर २००८ रोजी मुंबई येथे अटक झाली होती. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. परळीत देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या अटकेचा निषेध केला(Arrest warrant against Raj Thackeray).

यादरम्यान, कार्यकर्त्यांनी सार्वजनिक वाहतूक असणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेवर धर्मापुरी पॉइंट येथे दगडफेक केली. दगडफेकीत बसचे समोरील काच फुटून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले होते.

देवेंद्र फडणवीसांनी शिवतीर्थावर राज ठाकरेंची घेतली भेट

महाराष्ट्रात कठोर निर्बंधांबाबत निर्णयाची शक्यता

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, चिथावणीखोर भाष्य केल्याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये राज ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल गु.रं.नं 208/2008अन्वये गुन्हा कलम 143 427 336 109 भा दं वि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीसांनी तपास करुन राज ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध परळी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

लवकरच महाराष्ट्र पोलिसांनाही ‘वर्क फ्रॉम होम’

Sushant Singh Rajput Demise: Raj Thackeray’s MNS Appeals Artists To Approach Them If They Face Nepotism In Bollywood

‘शिवतीर्थ’वरील चार कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे राज ठाकरे यांनी आपल्या पुढील १० दिवसांतील कार्यक्रम आणि बैठका रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता राज ठाकरे न्यायालयाकडून सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी वेळ मागून घेणार का आणखी काही कायदेशीर मार्ग काढणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी