राजकीय

नाना पटोलेंचा आरोप राष्ट्रवादीने फेटाळला

टीम लय भारी

मुंबई :- महाविकास आघाडी पक्षांमध्ये मतभेद असल्याचे चित्र दिसून येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला आहे. मी कुठे काय करतो हे सगळे त्यांना माहिती आहे. असे म्हणत नाना पटोलेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर आरोप केला आहे. नाना पटोलेंच्या या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिउत्तर दिले (Nana Patole allegation was rejected by the NCP).

मुंबईत नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी नवाब मलिक म्हणाले, नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा केलेला आरोप हा माहिती अभावी आहे. त्यांनी त्यांच्या पक्षातील माजी मुख्यमंत्र्यांकडून माहिती घेऊन आरोप करावेत असे नवाब मलिक यांनी नाना पटोलेंना प्रतिउत्तर दिले आहे.

पंकजा मुंडे घेणार नाराज समर्थक आणि पदाधिकाऱ्यांची भेट

आदित्य ठाकरेंचा महत्वकांक्षी उपक्रम, राज्यातील सगळे किल्ले होणार देखणे

यानंतर नबाब मलिक म्हणाले, कोणतेही सरकार असेल तरी अशा पद्धतीने माहिती गृहखाते संकलित करत असतो. सुरक्षेच्या दृष्टीने राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांवर लक्ष असते. हे आताच होत आहे असे नाही. सुरक्षा यंत्रणा अलर्ट करण्यासाठी हे प्रत्येक सरकारमध्ये होते. नाना पटोले यांनी त्यांच्या पक्षातील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून माहिती घ्यावी. त्यांनी माहिती न घेतल्याने असे आरोप करत आहेत असे प्रतिउत्तर नवाब मलिक यांनी दिले आहे. नाना पटोलेंना वाटत असेल त्यांच्या नेत्यांना, त्यांच्या कार्यक्रमाला पोलीस बंदोबस्त नको असेल तर त्यांनी तसे सांगावे, तसे पत्र गृहविभागाला द्यावे, असेही नवाब मलिक म्हणाले आहेत.

नाना पटोले

राम शिंदेंनी रोहित पवारांची उडविली खिल्ली

Uddhav Thackeray, Ajit Pawar tracking my moves: Congress’ Nana Patole

काय म्हणाले नाना पटोले

नाना पटोले म्हणाले, त्यांच्याकडे गृहमंत्री आणि मुख्यमंत्रिपद आहे. त्यामुळे यंत्रणांना सर्व रिपोर्ट त्यांना द्यावे लागतात. कुठे कुठे काय चालू आहे, आंदोलन कुठे चालू आहेत, हे सगळे त्यांना अपडेट द्यावे लागतात. मी कुठे काय करतो ते सगळे त्यांना माहीत आहे. महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे हे त्यांना माहीत आहे असे म्हणत नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला आहे. यानंतर ते म्हणाले, त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. हे त्यांना माहीत नाही का? ते कुठे ना कुठे आपल्याला पिंजऱ्यात आणायचा प्रयत्न करत आहेत, असेही नाना पटोले म्हणाले आहेत (That is also what Nana Patole has said).

Rasika Jadhav

Recent Posts

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

1 hour ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

2 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

2 hours ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

2 hours ago

कुटुंबीयांसमवेत मंत्री छगन भुजबळ यांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी आज…

2 hours ago

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

15 hours ago