राजकीय

पंकजा मुंडे घेणार नाराज समर्थक आणि पदाधिकाऱ्यांची भेट

टीम लय भारी

मुंबई :- भाजप पक्षाकडून मुंडे घराण्याला डावलण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तार यादीतून बीडच्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांचे नाव डावलण्यात आल्यामुळे मुंडे समर्थक अतिशय नाराज झाले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे उद्या भाजप नेत्या पंकजा मुंडे या सर्व समर्थक आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत (Pankaja Munde will meet disgruntled supporters and office bearers).

बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये डावलण्यात आल्यामुळे मुंडे समर्थक अतिशय नाराज झाले आहेत. त्यामुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे समर्थकांची भेट घेणार आहेत. मुंडे समर्थक आणि बीड येथील भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे 77 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन थेट मुंबईला रवाना झाले आहेत. त्यामुळे उद्या भाजप नेत्या पंकजा मुंडे या सर्व समर्थक आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

आदित्य ठाकरेंचा महत्वकांक्षी उपक्रम, राज्यातील सगळे किल्ले होणार देखणे

राम शिंदेंनी रोहित पवारांची उडविली खिल्ली

पंकजा मुंडे यांनी आपण नाराज नसल्याचे सांगूनही बीड येथील भाजपचे पदाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत. जिल्ह्यात भाजप पदाधिकाऱ्यांत अतिशय नाराजीचे सूर असून आणखी राजीनामे येण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा आशयाचे पत्र भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लिहिले आहे.

77 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन जिल्हाध्यक्ष मस्के हे मुंबईकडे रवाना झाले आहेत. यात भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या जयश्री मस्के यांचाही समावेश आहे. उद्या भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन यावर चर्चा करणार आहेत. या राजीनामा सत्रावर भाजप प्रदेश कार्यकारिणी काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे (All eyes are on the decision of the BJP state executive on this resignation session).

पंकजा मुंडे

जिनके हाथ खून से रंगे हो, वो… चाकणकरांची केंद्रीय मंत्रिमंडळावर बोचरी टीका…

‘Upset’ Pankaja Munde meets PM Modi, JP Nadda in Delhi

पंकजा मुंडे नाराज नसतील पण खासदार डॉ. प्रितम मुंडे यांना डावलण्यात आल्याने आमची नाराजी कायम आहे, असे सांगत सर्वात अगोदर जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिला. यांच्यानंतर जिल्हा परिषद सदस्या सुनिता बडे, पंचायत समिती सदस्य प्रकाश खेडकर यांच्यासह जवळपास २० पदाधिकार्‍यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

पंकजा मुंडेंनी घेतली मोदींची भेट

प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याची माहिती मिळत आहे. त्यातच पंकजा मुंडे या पंतप्रधान मोदी यांना दिल्लीला भेटण्यास गेल्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे (Pankaja Munde visit to Delhi to meet Prime Minister Modi has sparked a number of political discussions).

भाजप पदाधिकाऱ्यांच्या राजीनामा सत्राची दखल केंद्रीय नेतृत्वाने घेतली आहे. याविषयीच बोलण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे रविवारी सकाळी तातडीने मोदींची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाल्या होत्या. दरम्यान, दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय सचिवांची बैठक भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडून आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि विजया रहाटकर उपस्थितीत होत्या. ही बैठक तासभर चालली. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्यासह इतर पदाधिकारी पंतप्रधान मोदींच्या भेटीला 7 लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी गेल्या होत्या.

Rasika Jadhav

Recent Posts

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

46 mins ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

3 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

3 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

4 hours ago

सराईत गुन्हेगारांच्या 6 मित्रांची ‘तडीपारी’! पोलीस उपायुक्त चव्हाण

गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्तालयाकडून तडीपारीची (deported) कारवाई केली जाते. मात्र…

4 hours ago

नाशिक शरणपूर येथे ज्येष्ठ नागरिकाला धमकावत सायबर चोरट्यांनी उकळले सात लाख

मोबाइल क्रमांकावरुन सुरु झालेल्या बँक खात्यावर सहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार  झाल्याचे धमकावून व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी…

6 hours ago