राजकीय

फडणवीसांच्या इशाऱ्यावरच राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू, नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट

टीम लय भारी

मुंबई: नवाब मलिक यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. राज्यात ड्रग्जचा खेळ हा फडणवीस यांच्या इशाऱ्यावरूनच सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला (Nawab Malik’s serious allegations against Devendra Fadnavis).

फडणवीस यांच्या आशीर्वादानेच आणि देखरेखीखाली राज्यात ड्रग्जचा धंदा सुरू असल्याचा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला. या ड्रग्ज कनेक्शनची सीबीआय चौकशी व्हावी अशीही मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. अमृता फडणवीस यांच्या रिव्हर मार्चच्या गाण्याला ड्रग्ज पेडलरने फायनान्स केला असल्याचाही गंभीर आरोप नवाब मलिक यांना माध्यमांशी बोलताना केला.

समीरभाऊ मियाँ वानखेडे

नवाब मलिकांनी कॉर्डेलिया क्रूझवरील पार्टीतील व्हिडीओ केला शेअर; म्हणाले…

काशिद खानसारख्या मोठ्या ड्रग्ज पेडलरला सोडून देण्यात येते. ऋषभ सचदेवा, आमीर फर्निचरवाला, प्रतिक गाभाला सोडण्यात येते. सर्व ड्रग्जचा खेळ हा देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर राज्यात सुरू आहे. अतिशय जबाबदारीने सांगतो की, प्रतिक गाभा कोण आहे ? प्रतिक गाभा कोणकोणत्या शहरात आणि हॉटेलमध्ये पार्टी ऑर्गनाईज करतो ? एक टेबलची किंमत ही ५ लाख ते १५ लाख कशी होते ? या खेळात प्रतिक गाभा सर्वात मोठे कॅरेक्टर आहे. त्याला आगामी काळात आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत. संपुर्ण ड्रग्जच्या खेळाचा मास्टरमाइंड हे राज्याचे पूर्व मुख्यमंत्री आहेत का ? असा प्रश्न आमच्या मनात निर्माण होतो आहे.

भाजपच्या लोकांना पार्टीतील कारवाई दरम्यान का सोडले जाते ? आम्हाला माहित नव्हत असा खुलासा भाजपचे लोक करतात. पण तुमच्याच डोळ्याखाली ड्रग्जचा धंदा होत होता असेही नवाब मलिक म्हणाले. येत्या काळात आणखी असे फोटो आम्ही समोर आणणार आहोत, जे ड्रग्ज पेडलर आहेत आणि भाजपमध्ये होते आणि आहेत. हे सगळ्या गोष्टी आम्ही येत्या दिवसांमध्ये उघडकीस आणणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणातच राज्यात ड्रग्जचा धंदा सुरू आहे, असाही आरोप नवाब मलिक यांनी केला. फडणवीस हेच राज्यात ड्रग्ज पेडलर्सला संरक्षण देत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

नवाब मलिकांच्या नवीन ट्विटनं राज्यात खळबळ…

Maharashtra BJP Chief Slams Minister Nawab Malik For “Giving Threats”

अमृता फडणवीस यांच्या रिव्हर मार्चच्या गाण्यावरही नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या गाण्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हेदेखील झळकले होते. या गाण्याला ड्रग्ज पेडलर असलेला जयदीप राणा हा कसा काय फायनान्स हेड असू शकतो ? असा प्रश्न नवाब मलिक यांनी केला आहे. हे गाणे अमृता फडणवीस यांनी गायिले होते. तर अनेक राजकारण्यांनीही या गाण्यात काम केले होते. या गाण्याच्या फायनान्सला प्रश्न विचारत नवाब मलिक यांनी मोठे आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले आहेत. राज्यात सर्व ड्रग्जचे धंदे हे फडणवीसांच्या आशीर्वादाने सुरू असून या प्रकरणाची न्यायिक आणि सीबीआय चौकशीही झाली पाहिजे अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

कीर्ती घाग

Recent Posts

संविधाना संदर्भात वारंवार कॉग्रेस कडून जनतेची दिशाभुल – माजी मंत्री दिलीप कांबळे

गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…

25 mins ago

मतदान हे देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी करा – मंत्री छगन भुजबळ

मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…

44 mins ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…

1 hour ago

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

16 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

17 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

17 hours ago