33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeसंपादकीयसमीरभाऊ मियाँ वानखेडे

समीरभाऊ मियाँ वानखेडे

विश्वास काश्यप टीम लय भारी

राम राम , जयभीम , सलाम वालेकुम !

जिनके अपने घर शिशे के हो ,

 वो दुसरों पर पत्थर नही फेका करते .

या डायलॉगचा अर्थ म्हणजे तुमच्यासारख्या सरकारी नोकराने जीवनामध्ये कसे जगावे याचा साधा सरळ अर्थ .

तुम्ही उगाचच कशाला जाणून-बुजून लफड्यात पडलात ? पाच आकडी पगार आहे , राहायला लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये करोडोचे घर आहे . घर ते ऑफिस यायला जायला सरकारी फुकटची एसी गाडी आहे . सरकारी काम व्यवस्थित करायचं सोडून कशाला हिरोगिरी करत बसलात ? तुमच्यासारखे प्रसिद्धीला हपापलेले वरिष्ठ अधिकारी हे स्वतःला देवदूत समजायला लागलेत . तुमच्या लोकांचे काम कमी आणि ओरडणेच जास्त असते (Paramvir Singh had written a bond of Rs 1 crore to a political activist).

गेल्या पंधरा-वीस वर्षांत आय.ए.एस.,आय.पी.एस. आय.आर.एस. झालेल्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या डोक्यात एक भलतीच हवा गेली आहे. ही मंडळी स्वतःला काय समजतात हे त्यांनाच माहित.  त्यांचे खाते आणि संबंधित कायदा हा त्यांच्या बापाच्या घरचाच आहे अशा पद्धतीने ते वागतात .

समीर वानखेडेंची चौकशी करणारी टीम चुकांवर पांघरून घालणारी नसावी, जयंत पाटलांचा खोचक टोला

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सरकारमध्ये बसून हेरगिरी करणाऱ्यांना चपराक; नाना पटोलेंचा हल्लाबोल

मध्यंतरी ते आय.पी.एस . परमवीरसिंग ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना त्यांनी एका राजकीय कार्यकर्त्याकडून  एक कोटीचा बॉंड लिहून मागितला होता . पाच ,दहा , पंधरा हजाराच्या वर बॉण्ड घेतला जाऊ नये हा अलिखित नियम आहे . या महाशयाने त्या कार्यकर्त्याकडून एक कोटीचा बॉण्ड लिहून मागितला . कोणत्या कायद्यान्वये ? तर स्वतःच्या मर्जीच्या कायद्यान्वये . तुमच्या काय बापज्याद्याचा कायदा आहे का ? आता पळतोय स्वतःच इकडून तिकडून . अशा अधिकाऱ्यांना रस्त्यावर नागडा करून मारला पाहिजे . सत्तेची मस्ती उतरेपर्यंत झोडला पाहिजे . असो .

समीर मियाँ, त्या परमवीरसिंगच सोडा . तो त्याच्या कर्माची फळ भोगतोय . पण एकंदर तुमचा पण झटपट प्रवास पाहता तुम्ही सुद्धा परमवीरसिंगला गुरू केल्याचं लक्षात यायला लागल आहे . अहो , आजूबाजूला सगळे द्रोणाचार्य  खुर्च्यांवर बसलेत . कलियुगात ते तुमचा अंगठा नाही तर पाची बोटं तोडून घेतील आणि हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही . तेव्हा जरा दमानं घ्या .

समीर वानखेडेंच्याविरोधात हे 4 अधिकारी करणार चौकशी!

mumbai: Picture that%E2%80%99s %E2%80%98baki%E2%80%99 will end only when Sameer Wankhede loses job, says Nawab Malik

तुम्ही सगळ्यांना डावलून एकदमच हिरो व्हायला निघाले . तुमच्या आजूबाजूला तुमचे सीनियर ज्युनिअर असतीलच की . ते काय तुम्हाला सोडणार आहेत ? आज जे जे खाजगी प्रकरण तुमची बाहेर येत आहेत ती काही आपोआप येतात की काय ? नवाब मलिक साहेब काय जादूगर आहेत ? त्यांना सगळी माहिती पुरवली जात आहे . जरा संभाल के मियाँ .

समीर भाऊ स्वतःबद्दल बराच भ्रम बाळगून आहात तुम्ही . तुम्हाला लहानपासून पिक्चरची भरपूर आवड होती वाटतं . तुम्हाला पूर्वीपासूनच शाहरुख खान आवडत नाही का हो ?  थोडा जास्त अभ्यास केला असता तर आय आर एस  ऐवजी आय ए एस  झाला असता असे नाही वाटत का आपल्याला . असो .

समीरमियाँ , सध्या तो आर्यन खान राहिलाय बाजूला . तुमचंच इन्वेस्टिंगशन चालू आहे दिवसभर . नवाबभाई विरुद्ध समीरभाईची फॅमिली . वेगळेच चालू आहे मीडियामध्ये . याला सुद्धा शुद्ध मराठीत तमाशा म्हणतात .

पाच-सहा वर्षांपूर्वी शीना बोरा नावाची केस मुंबईमध्ये आणि प्रामुख्याने संपूर्ण भारतात गाजली होती .या बाईने तिच्या सख्या मुलीचा फिल्मी स्टाईलने खून केला होता . तिची सुद्धा स्टोरी तमाशापटा सारखीच होती . तिच्या पहिल्या नवर्‍याची दोन मुले . मग पहिला नवरा सोडला . दुसरा नवरा केला . त्याच्या पासून एक मूल . मग तिने तिसरा नवरा केला . त्याला त्याच्या पहिल्या पत्नीपासून एक मोठा मुलगा होता . मग त्या मुलाचे आणि शीना बोराच्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलीबरोबर प्रेमप्रकरण सुरू झाले . मग हे प्रकरण वाढत वाढत त्याचे रूपांतर मुलीच्या खुनात झाले .

तुमचं पण असंच काहीतरी आहे . तुम्ही वानखडे म्हणजे हिंदू महार . मग तुमचे पहिले लग्न मुस्लिम डॉक्टर महिलेशी मुस्लिम पद्धतीने झाले .तो निकाह तुमचा मोडला . मग तुम्ही हिंदू मुलीशी लग्न केले . तुमच्या सख्या बहिणींची  नावं मुस्लिम पद्धतीचे आहेत . यूपीएससी परीक्षा देताना तुम्ही परीक्षेच्या फॉर्म मध्ये कोणती जात लिहिली माहिती नाही .

समीरभाऊ , तुम्ही हिंदू महार म्हणून स्वतःला घेत आहात . हे एकदाच बरं झालं . तुम्ही महार आहात बौद्ध नाही . कारण बौद्ध होणं म्हणजे सत्य बोलणं आणि उच्च प्रतीची नैतिकता बाळगणं . तुमच्या वडिलांना आता अट्रोसिटी कायदा का काय ते आठवायला लागलंय . तुम्ही जेव्हा कायदेशीर बाबीत अडकता तेव्हा तुम्हाला जात आठवते का ? अट्रोसिटी  कायदा तुमच्यासारख्यांमुळे बदनाम झालाय . तुम्ही आणि तुमच्या वडिलांनी काय केलंय हो समाजासाठी  ?

परीक्षेमध्ये राखीव कोट्यातून पास होण्यापुरतच तुम्ही तुमचं  मागासपण मिरविता . नाहीतर तुम्ही पटकन नवब्राह्मण होता .

तुम्ही मागासवर्गीय आहात म्हणून तुमच्यावर अन्याय होत आहे असा मतलबी टाहो सध्या तुम्ही फोडत आहात . देशात , महाराष्ट्रात मागासवर्गीयांवर हजारो अन्याय होतात तेव्हा कुठे गेला होता राधा सुता तुझा धर्म . १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांना वंदन करणारी पोस्ट कधी दिसली नाही तुमची किंवा ६ डिसेंबरला चैत्यभूमीला सुद्धा कधी तुमचे दर्शन झाले नाही . समीरभाऊ बस झाले तुमच्या मंडळींचा स्वार्थी अभिनय .

तुमच्यासारखा परीक्षेच्या अगोदर मागासवर्गात असणारा परीक्षार्थी हा अधिकारी झाल्यावर स्वतःला काय समजतो हे त्याचे त्यालाच माहित . तो हवेतच असतो . शाळेत फाटकी चड्डी आणि अनवाणी पायाने गेलेला तो स्वतःचा इतिहास विसरतो . वरिष्ठ आणि उच्च वर्तुळात राहून तो स्वतःला शहाणा समजायला लागतो . थोडक्यात तो बेईमान आणि माजुरडा  होतो . परीक्षेपुरता मागास असलेला परीक्षार्थी , अधिकारी झाल्यावर मात्र डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेताना कधीच दिसत नाही . सवलती घेताना बाबासाहेब नंतर काय संबंध .( काही सन्माननीय अपवाद वगळता ) त्या चकाचौंध दुनियेत राहून तो त्याचे मूळ विसरतो . स्वतःला वेगळाच समजायला लागतो .

तुम्ही आर्यनखानच्या केस मध्ये घेतलेले साक्षीदार भ्रष्ट निघाले . तुमचा खबरी एका राजकीय पक्षाचा सक्रिय पदाधिकारी निघाला . तुम्ही फक्त प्रसिद्धीसाठी शाहरुख खानच्या मुलाला टारगेट केलेत हे प्राथमिक अवस्थेत दिसत आहे . काय मिळवलं फुकटची थर्ड क्लास प्रसिद्धी मिळवून ?

९५%आयएएस ,आयपीएस ,आयआरएस प्रसिद्धीसाठी काम करतात . तुम्ही जे काम करता त्याचा तुम्हाला लाखो रुपये पगार मिळतो . फुकट काम करता की काय ? कशाला हवी प्रसिद्धी ? निमूटपणे पगारा एवढे काम करा आणि घरी निघून जा . मीडियाला सोबत घेऊन नुसत्या उचापती करून काम करायची सवय लागली आहे यांना . काम कमी आणि प्रसिद्धीचा हव्यास जास्त अशी अवस्था आहे यांची . फक्त पाच टक्के आयएएस आयपीएस आयआरएस प्रत्यक्षात समाजासाठी , देशासाठी काम करतात . ही मंडळी टीव्ही चॅनेल घेऊन फिरत नाही . ते आपलं काम भलं आणि आपण भलं असे जगत असतात . फार उच्च प्रतीच काम करतात ही पाच टक्के वरिष्ठ मंडळी . यांच्या कर्तृत्वावरच देश प्रगती करत आहे . नाहीतर तुम्ही आहात पाच पैशाचं काम करून एक रुपयाचं केलं असं दाखवायचं . घाणेरडी सवय लागली तुम्हा लोकांना .

समीरभाऊ मियाँ जर भविष्यात तुमची नोकरी टिकणारच असेल तर अजून बरीच वर्षे नोकरी बाकी आहे . नोकरीमध्ये असल्या फालतू प्रसिद्धीपेक्षा नैतिकता आणि इमानदारी यांना महत्त्व द्या . उगाचच फिल्मी लोकांमध्ये राहून कायमचे खलनायक होऊ नका .

खुदाहाफिस ,रामराम ,जयभीम.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी