राजकीय

राष्ट्रवादीच्या कार्यालयाची तोडफोड, पडळकरांचे कार्यकर्ते आक्रमक

टीम लय भारी

मुंबई :- सोलापुरमध्ये काल सकाळी आमदार गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांच्यावर जाहीर टीका केली. त्याचदिवशी सायंकाळी पडळकरांच्या गाडीवर दगडफेक झाली. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली आहे (NCP office vandalized Padalkar activists aggressive).

सोलापूर मध्ये काल सायंकाळी गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. आज सोलापूर मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयावर दुपारी दगडफेक करण्यात आली आहे. ही दगडफेक गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी केली आहे. कार्यालयावर दगदफेक करताना एकच छंद, गोपीचंद अशा घोषणा देत, पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे (Padalkar activists have vandalized the NCP office). कालपासून सुरू झालेला हा वाद आता पेटत असल्याचे दिसून येत आहे.

शरद पवार मोठे नेते आहेत, हे मी मानत नाही; गोपीचंद पडळकर

दगडफेकीनंतर पडळकर आक्रमक, आरोपीसोबत रोहित पवारांचा फोटो शेर…

गोपीचंद पडळकरांवर हल्ला करून आरोपीने तेथून पळ काढला होता. यानंतर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे. या प्रकरणातील अज्ञात आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या आरोपीची ओळख पटली असून पोलिसांनी शोध कार्य सुरू केले आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘हे खपवून घेणार नाही’, निलेश लंकेंचा थेट पडळकरांना इशारा

Maharashtra BJP Leader Says His Car Was Attacked With Stone In Solapur

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा 25 वर्षीय तरुण धनगर समाजातला आहे, याचे शिक्षण BA झाले आहे. तो एका शाळेत लॅबमध्ये असिस्टंट म्हणून काम करतो. मागील वर्षी याने याच सरकार विरोधात मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन केल्याची माहिती आहे. मात्र गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर हल्ला करण्यामागे नेमके काय कारण असेल हे अटकेनंतर समजेल.

Rasika Jadhav

Recent Posts

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

59 mins ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

2 hours ago

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

3 hours ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

4 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

5 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

6 hours ago