31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयशरद पवार मोठे नेते आहेत, हे मी मानत नाही; गोपीचंद पडळकर

शरद पवार मोठे नेते आहेत, हे मी मानत नाही; गोपीचंद पडळकर

टीम लय भारी

मुंबई :- माध्यमांशी बोलतांना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, ओबीसी आरक्षण रद्द होण्याला महाविकास आघाडी सरकार जवाबदार आहे. यानंतर पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांवर घणाघात बोल केले. शरद पवार मोठे नेते आहेत, मी असे मानत नाही असे गोपीचं पडळकर म्हणाले (Sharad Pawar is a great leader, I don’t think so, said Padalkar).

काही जिल्ह्यांसाठी मर्यादित असलेल्या नेत्यांना मी मोठे नेते मानत नाही. शरद पवार हे साडेतीन जिल्ह्याचे स्वामी असले तरी, शरद पवार मोठे नेते आहेत हे मी मानत नाही. तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. मी शरद पवार आणि अजित पवारांशी मुद्दयावरुन भांडतो, असे गोपीचंद पडळकर म्हणाले (I am arguing with Sharad Pawar and Ajit Pawar over the issue, said Gopichand Padalkar).

पडळकरांची बाळासाहेब थोरातांवर अश्लिल शब्दात टीका, प्रत्युत्तर देताना लेकीने ‘संस्कार’ दाखवले!

पवारांच्या भेटीनंतर शेतकरी व सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने घेतली अजित पवारांची भेट

यानंतर गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर जोरदार टिकांचा वर्षाव केला. ओबीसींना नेहमी राष्ट्रवादीमध्ये मागे केले जाते. शरद पवार जातीवाद करत आहेत. धोक्याने जे सरकार आले त्या सरकारमध्ये ओबीसी समाजाचा नेता उपमुख्यमंत्री का झाला नाही? धनंजय मुंडे किंवा अमोल कोल्हे हे का प्रदेशाध्यक्ष झाले नाहीत. हे ओबीसी नेते का समोर आले नाहीत? ओबीसींसाठी आंदोलन करण्यासाठी धनंजय मुंडेंना रस्त्यावर का उतरावे लागले.

भाजपा कधीच जातीवाद करत नाही. ओबीसी आमदारांची संख्या भाजपमध्येच सगळ्यात जास्त आहे. मागच्या सरकारमध्ये आणि या सरकारमध्ये मंत्री यादी काढली तर कोण जातीयवादी आहे हे लक्षात येईल. धनंजय मुंडे, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे यांनी मागच्या वेळी आंदोलने केली, हे सर्व ओबीसीचे नेते आहेत. मात्र, विश्वासघाताने हे सरकार आले तेव्हा उपमुख्यमंत्री पदासाठी पुतण्या अजित पवारांना का पुढे आणले?  असा प्रश्न पडळकरांनी शरद पवारांना विचारला आहे.

कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून शरद पवार लवकरच घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

Sharad Pawar, Uddhav Thackeray Meet Amid Reports Of Maharashtra Alliance Strain

यानंतर शरद पवारांच्या दिल्लीत झालेल्या बैठीक बाबत पडळकरांनी खिल्ली उडवत म्हणाले, मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी प्रधानमंत्री आहेत. त्यांना भावी प्रधानमंत्रीपदासाठी शुभेच्छा. रात गेली हिशोबात पोरगं नाही नशिबात, त्यामुळे पुढे कुठल्यातरी लवणात ससा सापडेल अशी अपेक्षा आहे. असे म्हणत गोपीचंद पडळकरांनी खिल्ली उडवली.

Sharad Pawar is a great leader, I don't think so, said Padalkar
शरद पवार आणि गोपीचंद पडळकर

यानंतर पडळकर म्हणाले, कोंबड्याला वाटतं मी आरवल्याशिवाय दिवस उजाडत नाही, असे कोंबडे दिल्लीत एकत्रित आले होते, असा घणाघात पडळकरांनी पवारांच्या दिल्ली बैठकीवरुन केला आहे.

ओबीसी आरक्षणावर बोलतांना पडळकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी संदर्भात राज्य सरकारला डाटा सादर करण्यास सांगितले होते. मात्र, राज्य सरकारने ते केले नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे (DNA) बहुजन विरोधी आहे. म्हणूनच काँग्रेसमधील नेत्याच्या मुलाने विरोधी याचिका दाखल केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी