राजकीय

Nilesh Rane : निलेश राणेंना तृतीयपंथियाने भरला दम, ‘बाजार उठविण्याची’ दिली तंबी

टीम लय भारी

मुंबई : बेलगामपणे मुक्ताफळे उधळत सुटलेल्या माजी खासदार निलेश राणे ( Nilesh Rane ) यांची अब्रुच एका तृतीयपंथियाने चव्हाट्यावर आणली आहे. राणे यांनाही लाजवेल इतक्या प्रभावी मराठी भाषेत या उच्च शिक्षीत तृतीयपंथियाने ट्विट केले आहे. त्यात त्यांनी राणे यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून निलेश राणे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याचा सपाटा लावला आहे. आपल्या अशा या नित्यक्रमानुसार निलेश राणे ( Nilesh Rane ) यांनी आणखी एक ट्विट केले होते. त्यात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा उल्लेख ‘हिजडा’ असा केला आहे. या शब्दांवर तृतीयपंथी असलेल्या सारंग पुणेकर यांनी आक्षेप घेतला आहे.

‘हिजडा’ या शब्दाचा अर्थ माहित नसेल तर तो मी सांगते. पण आपली बालिश बुद्धी जगाला दाखवू नका. जेव्हा नाकात वेसण नसलेलं हलगट सैरावैरा पळतं, तशी तुमची गत झाली आहे. तोंडाला आळा घाला. ‘हिजडा’ शब्द मागे घ्या, नाहितर योग्य तिथे बाजार उठवला जाईल, असा इशारा सारंग पुणेकर यांनी दिला आहे.

वडिलधाऱ्या व प्रतिष्ठीत मान्यवरांवर निलेश राणे ( Nilesh Rane ) सतत खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. शब्द तोलून मापून वापरण्याची ते काळजी घेत नाहीत. या स्वभावातूनच त्यांनी राज्यमंत्री तनपुरे यांना ‘हिजडा’ म्हणून हिणवले. दुसऱ्या बाजूला राणे यांनी तृतीयपंथियांचाही अपमान केला.

वंचित, दुर्लक्षित व समाजाने नेहमीच अन्याय केलेला तृतीयपंथी वर्ग आहे. कुणीही यावे आणि त्यांची चेष्टा करून जावे असे केविलवाणे प्रसंग तृतीयपंथियांच्या वाट्याला येत असतात. समाजकंटकांकडून तृतीयपंथियांना हिणवले जात असतेच. पण चक्क माजी खासदार असलेल्या निलेश राणे यांनीही तृतीयपंथियांना हिणवले. त्यामुळेच सांरग पुणेकर यांनी राणे यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले होते निलेश राणे ?

‘कोणतरी तनपुरे नावाचा हिजडा राज्यमंत्री आहे. त्याला माझा कार्यक्रम करायचा आहे. असे कार्यक्रम करणारे आम्ही खूप बघितले. समोर आले की,… होते साल्यांची. जागा सांग तनपुरे. येतो मी.’ असे गलिच्छ भाषेतील ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

मेहबुब शेख यांच्याकडूनही हल्लाबोल

सारंग पुणेकर यांनी ट्विट केल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी पुणेकर यांना पाठींबा दर्शविणारे ट्विट केले आहे. ‘याच्या वायफळ बोलण्यामुळे याचा राजकीय बाजार उठला आहे. हे दोन वेळा लोकसभेला आपटले आहेत. यांच्यामुळे वडिलांचेही राजकीय नुकसान झाले आहे. तरीही सुधरायचे नाव घेत नाहीत’ अशा शब्दांत शेख यांनी निलेश राणेंना टोला लगावला आहे.

हे सुद्धा वाचा

Nilesh Rane ‘पवारांवर बोलण्याअगोदर निलेश राणेंनी वडीलांचा सल्ला घ्यावा’

Rane VS Pawar : निलेश राणेंनी शरद पवारांना डिवचले, रोहित पवारांवरही खालच्या पातळीवरील टीका

Watch | Lockdown 4.0: A list of what is allowed

तुषार खरात

Recent Posts

तणावापासून मुक्ती मिळवायची आहे? तर दररोज करा हे 4 योगासने

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…

2 hours ago

Sanjaymama Shinde यांच्या नावाने माढ्यातील ३६ गावांतील जनताही बोंब मारते | Vidhansabha 2024

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…

2 hours ago

अजित पवार पळपुटे | शरद पवारांचा वारसा सुप्रिया सुळे, रोहित पवार चालवतील | Sanjaymama Shinde

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Sharad Pawar's legacy will be run…

2 hours ago

SanjayMama Shinde | आमदारांनी नक्की काय केले ? दिवे लावले, प्रकाश पाडला, पीएचडी – संशोधन केले ?

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत (What exactly did…

3 hours ago

ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर फेकू नका, अशा प्रकारे करा वापर

ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर आपण कचऱ्यात फेकतो असे सामान्यतः पाहिले जाते, परंतु आपण कधी विचार…

3 hours ago

ही काळ्या पिठाची पोळी खाल्याने लवकर वजन होणार कमी

पावसाळ्याच्या दिवसात आपली पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळे जड पदार्थ खाणे, उच्च प्रथिनयुक्त आहार, जास्त तेल…

3 hours ago