31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
HomeराजकीयNilesh Rane ‘पवारांवर बोलण्याअगोदर निलेश राणेंनी वडीलांचा सल्ला घ्यावा’

Nilesh Rane ‘पवारांवर बोलण्याअगोदर निलेश राणेंनी वडीलांचा सल्ला घ्यावा’

टीम लय भारी

पुणे : अत्यंत गलिच्छ व एकेरी शब्दांत वयाने मोठ्या असलेल्या नेत्यांबद्दल निलेश राणे ( Nilesh Rane ) सतत विधाने करीत असतात. विरोधकांचीही प्रतिष्ठा ठेवून टीका करण्याची संस्कृती महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे एखाद्या नेत्याबद्दल विधान करताना निलेश राणे यांनी आपले वडील नारायण राणे यांचा सल्ला घ्यावा, असा उपदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे.

Rane Vs Pawar

माजी मुख्यमंत्री असलेले नारायण राणे हे आक्रमक नेते आहेत. पण ते कधीही खालच्या पातळीवरील टीका करीत नाहीत. वयाने मोठ्या असलेल्या लोकांबद्दल ते एकेरी शब्दांत बोलत नाहीत. त्यामुळे किमान आपल्या वडीलांचा तरी आदर्श निलेश राणे ( Nilesh Rane ) यांनी ठेवायला हवा.

Nilesh Rane should give respect to elder people, even they are opponent : Vikas Lawande

निलेश राणे आपल्या वडीलांशीही चांगले वागत नसावेत. अन्यथा त्यांनी अशी विधाने करताना वडीलांचा सल्ला नक्कीच घेतला असता. वडीलांशी चर्चा – विनिमय केली असती, तर अशी बेलगाम विधाने निलेश राणे ( Nilesh Rane ) यांनी केली नसती.

खालच्या पातळीवर जाऊन महाराष्ट्रातील नेते बिल्कूल टीका करीत नाहीत. पक्ष कोणताही असो, सगळेजण एकमेकांचा आदर ठेवूनच टीका करतात. निलेश राणे ( Nilesh Rane ) जर वयाने मोठ्या असलेल्या लोकांशी एकेरी व गलिच्छ शब्दांत टीका करीत असतील तर मतदारसंघातील लोकांशी कसे बोलत असतील याची कल्पनाही न केलेली बरी.

It’s look like Nilesh Rane never consulting with his father Narayan Rane : Vikas Lawande

कोकणातील जनता खरोखरच सूज्ञ वाटते. निलेश राणेंची ( Nilesh Rane ) औकात त्यांनी ओळखलेली दिसत आहे. त्यामुळेच सलग दोन वेळा कोकणातील जनतेने निलेश राणेंचा ( Nilesh Rane ) पराभव केला आहे. जनतेने अद्दल घडविल्यानंतरही निलेश राणे यांना अजून शहाणपणा आलेला दिसत नाही, असेही लवांडे यांनी म्हटले आहे.

नारायण राणे हे शरद पवारांचा आदर करतात. दीड वर्षापूर्वी शरद पवार कोकण दौऱ्यावर होते, त्यावेळी नारायण राणेंनी पवारांना सन्मानाने घरी बोलावले होते. राजकीय सल्ला त्यांनी पवारांकडून त्यावेळी घेतला होता.

नारायण राणे यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन वर्षभरापूर्वी झाले. या प्रकाशनासाठी शरद पवार यांना राणे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविले होते. त्यावेळी पवारांविषयी नारायण राणे यांनी जाहीर कौतुक केले होते.

राजकारणात नारायण राणे पवारांना आदर्श मानतात. याच पवारांवर निलेश राणे मात्र टीका करतात. पवारांवर टीका करण्याअगोदर निलेश राणे यांनी थोडातरी विचार करायला हवा, असाही टोला लवांडे यांनी लगावला.

निलेश राणे रोहित पवारांवर खालच्या पातळीवर जावून टीका करीत आहेत. रोहित पवारांचे कर्तृत्व निलेश राणेंनी ( Nilesh Rane ) जाणून घ्यायला हवे. स्वतःच्या हिंमतीवर रोहित पवार जामखेडमध्ये गेले व तो मतदारसंघ बांधला. मतदारसंघाची कशी बांधणी करावी याचे आदर्श उदाहरण रोहित पवारांनी राज्यासमोर घालून दिले आहे.

नारायण राणेंची कोकणात ताकद होती. ही ताकद निलेश राणे ( Nilesh Rane ) यांनी घालविली. वडिलांनी बांधलेला मतदारसंघ निलेश राणेंनी कमकुवत केला. निलेश राणे ( Nilesh Rane ) यांच्यात एवढीच हिंमत असेल तर त्यांनी रोहित पवारांच्या विरोधात जामखेडमधून निवडणूक लढवावी. निलेश राणेंचे डिपॉझिटही जप्त होईल असाही टोला लवांडे यांनी लगावला आहे.

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

Rane VS Pawar : निलेश राणेंनी शरद पवारांना डिवचले, रोहित पवारांवरही खालच्या पातळीवरील टीका

लॉकडाऊन : मजुरांच्या एसटीला यवतमाळमध्ये भीषण अपघात, चौघांचा मृत्यू!

Corona : शरद पवारांचे नरेंद्र मोदींना आणखी एक पत्र, शेती संकटात असल्याकडे वेधले लक्ष

केंद्र स्थलांतरीत मजुरांचे 85% रेल्वे भाडे देते याचा पुरावा द्या अन्यथा जनतेची माफी मागा; चंद्रकांत पाटील यांना काँग्रेसचे आव्हान

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी