Categories: राजकीय

पंकजाताई म्हणाल्या, माझ्या स्वाक्षरीमध्येही गोपीनाथ मुंडे यांचे नाव

टीम लय भारी

औरंगाबाद : कै. गोपीनाथ मुंडे यांनी वंचित घटकांसाठी मोठे काम केले. त्यासाठी अविरत कष्ट घेतले. संघर्ष केला. सामान्य जनतेनेही मुंडे साहेबांवर मनापासून प्रेम केले. मुंडे साहेबांनी केंद्रीय मंत्रीपदापर्यंत मजल मारली, ती केवळ जनतेच्या भक्कम पाठींब्यामुळेच. मुंडे साहेबांचे नाव मी जगाला विसरू देऊ देणार नाही. म्हणूनच माझ्या नावासोबत मी गोपीनाथ मुंडे साहेबांचेही नाव लिहित असते. माझ्या स्वाक्षरीमध्येही गोपीनाथ मुंडे यांचे नाव आहे, अशा भावना माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या.

मेहगांव (ता. कन्नड) येथील गावकऱ्यांनी कै. गोपीनाथ मुंडे यांचे मंदिर बांधले आहे. या मंदिराचा लोकार्पण सोहळा पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. कै. मुंडे यांच्याबद्दल पंकजाताईंनी यावेळी आठवणी व भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी आमदार हरिभाऊ बागडे, आमदार उदयसिंह राजपूत, वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रवीण घुगे, पंचायत समिती सभापती आप्पाराव घुगे आदी मान्यवर उपस्थित होते.

पंकजाताई पुढे म्हणाल्या की, कै. गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पुढे नेत असताना जबाबदारीचे भान मला आहे. सामान्य लोकांची सेवा करण्याची मी शपथ घेतली आहे. त्यामुळे मंत्री म्हणून गेल्या पाच वर्षांत मी अनेक चांगले निर्णय घेऊ शकले. कै. मुंडे साहेबांचे नेतृत्व संघर्षातून पुढे आलेले आहे. त्यांच्या समाजसेवेचा वसा मी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत सोडणार नाही. गोपीनाथ मुंडे या नावातच मोठी ताकद आहे. मुंडे साहेब संत भगवानबाबांचे भक्त होते. मुंडे साहेबांना तुम्ही आता मंदिरात स्थान दिले. त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. मी या ठिकाणी अनेकदा आले आहे. माझ्या संघर्षयात्रेचेही तुम्ही जोरदार स्वागत केले होते. सत्तेत होते तेव्हा या ठिकाणी अनेक विकासकामे करू शकले. मंदिराला निधी दिला. मंदिराचे भव्य रूप आता पाहायला मिळत आहे. भविष्यात आणखी भव्य रूप देता येईल, असेही आश्वासन पंकजाताईंनी यावेळी दिले.

जाहिरात

हे सुद्धा वाचा

VIDEO : राजू शेट्टी यांचा घणाघात : भाजप सरकारचा ‘हा’ चांगला निर्णय महाविकास आघाडीने सूडबुद्धीने बदलला

VIDEO : अधिकाऱ्यांच्या बदल्या सूडभावनेने नकोत : भाजपने ठणकावले

तुषार खरात

Recent Posts

‘खतरों के खिलाडी 14’ ग्रँड फिनालेमध्ये होणार आलिया भट्टची एंट्री

कलर्स टीव्हीचा प्रसिद्ध शो 'खतरों के खिलाडी 14' त्याच्या फिनाले जवळ आला आहे. या शोचे होस्ट…

33 mins ago

मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी दररोज करा ‘हे’ सोपे व्यायाम

आजकल सर्वनाचा सुंदर आणि फिट दिसायला आवडते. त्यासाठी लॉग योग, व्यायाम आणि जिम सुद्धा लावतात.…

1 hour ago

संध्याकाळी व्यायाम करणे योग्य की नाही? जाणून घ्या

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आपल्या शरीराकडे लक्ष्य द्याचा वेळ सुद्धा…

2 hours ago

Sharad Pawar | Jaykumar Gore यांचा शेजारी म्हणतो, शेतकऱ्यांसाठी शरद पवार किंग, जयकुमार गोरे पडणार

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jaykumar Gore's neighbor…

2 hours ago

जयकुमार गोरेंच्या कार्यकर्त्याची संपादक तुषार खरात यांना धमकी

आमदार जयकुमार गोरे यांची गु़ंडगिरी, त्यांनी केलेले गैरप्रकार, माण - खटावमधील जयकुमार गोरे यांची दहशत…

3 hours ago

झोपण्यापूर्वी दुधामध्ये मिसळून प्या ‘या’ सुक्या लाकडाची पावडर, त्वचेवर येईल चमक

निरोगी त्वचेसाठी लोक अनेक उपाय करतात. स्त्री असो की पुरुष सर्वचजण आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी…

3 hours ago