Categories: व्हिडीओ

VIDEO : हा चिमुकला म्हणतोय; मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन

विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन’ अशी आरोळी ठोकली होती. निवडणुकीअगोदर आणि निवडणुकीनंतरही त्यांच्या या गर्जनेची चांगलीच चर्चा झाली. ‘टिक टॉक’पासून ते अगदी ‘चला हवा येऊ द्या’सारख्या लोकप्रिय कार्यक्रमातही फडणवीस यांच्या या ‘पुन्हा येईन’ची खिल्ली उडविली गेली. आता तर चक्क एका शाळकरी मुलानेच ‘पुन्हा येईन’चा नारा दिला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात या चिमुरड्याने एक मिनिटाचे भाषण केले आहे. त्याच्या बोबड्या बोलांमुळे तो भाषणात नक्की काय बोलत आहे हे समजत नाही. पण समारोप करताना मात्र त्याने ‘पुढच्या वर्षी मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन’ असा नारा दिला आहे. त्याच्या या नाऱ्यावर विद्यार्थी, शिक्षक व उपस्थितांमध्येही जोराचा हंशा पिकला आहे. रायगड जिल्ह्यातील एका शाळेतील हा व्हिडीओ आहे. सध्या तो जोरदार व्हायरल झाला आहे.

जाहिरात

 

हे सुद्धा वाचा

देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये विरोधकांचे फोन टॅप; ठाकरे सरकारकडून चौकशीचे आदेश

देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर तुकाराम मुंढे, एकूण २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

चारचाकी असूनही अनेकजण आपटले; उध्दव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

मला देवेंद्र फडणवीस आणि चौकडीने छळले : एकनाथ खडसे

तुषार खरात

Recent Posts

‘खरे शिवसेना प्रमुख असाल तर…’ रत्नागिरीतून अमित शाहांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)…

8 mins ago

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

10 hours ago

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

11 hours ago

विरोधकांचा मोदी सरकारविरोधात ‘व्होट जिहाद’!

दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…

11 hours ago

राहुल गांधीची चायनीज तर मोदीजींची भारतीय गॅरंटी अमित शहा

या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…

11 hours ago

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…

11 hours ago