राजकीय

मराठा आरक्षणाच्या मूक आंदोलनात बड्या नेत्यांचा सहभाग

टीम लय भारी

मुंबई :- मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यापासून राज्यात या निकालाचे पडसाद उमटत असून, पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी आज पडली आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास सुरुवात झाली आहे. या मराठा आरक्षणाच्या मूक आंदोलनात बड्या नेत्यांचा सहभाग आहे (Big leaders are involved in the silent movement of Maratha reservation).

मराठा आरक्षण (Maratha Reservation) कायदा रद्द झाल्यापासून छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, रायगडावरून त्यांनी आंदोलनाची हाक दिली होती. पहिले आंदोलन कोल्हापूरात भर पावसात सुरू झाले आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी होत असलेल्या या ‘मूक आंदोलन’ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि वंचित बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सहभागी झाले आहेत. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही भाग घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आंदोलनात येऊन संभाजीराजेंना पाठिंब्यांचे निवेदन दिले आहे.

मराठा आंदोलनात प्रकाश आंबेडकर होणार सहभागी

राजकीय आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी संघटना आक्रमक, उद्यापासून महिनाभर आंदोलन

Udayanraje extends support to Sambhajiraje on Maratha reservation

आज सकाळी 8 वाजल्यापासून हजारो मराठा आंदोलक छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी जमा झाले. त्यानंतर 10 वाजता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शाहू समाधीचे दर्शन घेऊन आंदोलनात भाग घेतला. त्यानंतर संभाजी छत्रपती यांनीही शाहू महाराजांच्या समाधीस्थळी येऊन दर्शन घेतले. संभाजी छत्रपती आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनीही त्यांची भेट घेतली आणि आंदोलनाला भाजपचा पाठिंबा असल्याचे निवेदन दिले.

सर्वच जण काळ्या पोशाखात

यावेळी सर्वच आंदोलक काळ्या पोशाखात आले आहेत. स्वत: संभाजीराजेही काळ्या पोशाखात आले आहेत. सर्व आंदोलकांनी काळे कपडे घालतानाच तोंडावर काळा मास्क लावला आहे. सरकारचा निषेध करण्यासाठीच सर्वांनी काळा पोशाख परिधान केला आहे. तसेच आंदोलकांच्या हातात भगवे झेंडे होते. त्यामुळे संपूर्ण वातावरण भगवामय झाले आहे.

नागरिक म्हणून मोर्चात

मी मोर्चात नेता म्हणून नव्हे तर कोल्हापूरचा नागरिक म्हणून मोर्चात आलो आहे. मराठा समाजासाठी जो कोणी प्रयत्न करेल त्यांना माझा आणि भाजपचा पाठिंबा असेल. येत्या अधिवेशनात सरकारने मराठा आरक्षणाबद्दल मूलभूत मागण्या मान्य कराव्या, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

आंबेडकरांच्या एन्ट्रीने तर्कवितर्क

कोणतीही कुणकुण नसताना प्रकाश आंबेडकर या मोर्चात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संभाजीराजे आंबेडकरांना भेटले होते. त्याचवेळी आंबेडकरांनीही मोर्चात येण्याचे ठरले होते असे सांगितले जाते. मध्यतरी संभाजीराजे यांनी नव्या राजकीय पक्षाचे संकेत दिले होते. त्यामुळे आंबेडकर आणि संभाजीराजे राज्यात नवे राजकीय समीकरण निर्माण तर करणार नाही ना याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Rasika Jadhav

Share
Published by
Rasika Jadhav

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

14 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

14 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

15 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

15 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

15 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

18 hours ago