31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयमराठा आंदोलनात प्रकाश आंबेडकर होणार सहभागी

मराठा आंदोलनात प्रकाश आंबेडकर होणार सहभागी

टीम लय भारी

मुंबई :- सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले. मराठा समाज आणि संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मूक आंदोलनाला उदयापासून सुरूवात होत आहे. तसेच छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वात राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी होत असलेल्या ‘मराठा क्रांती मूक आंदोलनात’ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) सहभागी होणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वंशज असलेल्या छत्रपती संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासाठी जो लढा उभा केला आहे त्याला पाठिंबा देऊन सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यासाठी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) उद्या कोल्हापुरात जाणार आहेत.

जितेंद्र आव्हाडांचा आण्णा हजारेंना टोमणा; ट्विटवरून केली टीका

राजकीय आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी संघटना आक्रमक, उद्यापासून महिनाभर आंदोलन

Interview: No evidence that children will be hit worse in the third wave of the pandemic in India

काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे यांनी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट घेतली होती. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करताना अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. यामध्ये प्रकाश आंबेडकरांचाही (Prakash Ambedkar) समावेश होता. संभाजीराजेंनी २९ मे रोजी पुण्यात प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट घेतली होती. “मला शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे. शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर एकत्र येऊ शकतात, तर मी आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) का एकत्र येऊ शकत नाहीत? हा भेटीमागचा हेतू होता,” असे यावेळी त्यांनी म्हटले होते.

सर्वांचा मान राखून आणि कोरोनाच्या नियमांचे पालन करुन आंदोलन – संभाजीराजे

मराठा आरक्षणासाठी बुधवारपासून मूक आंदोलनाला सुरुवात होत असताना खासदार संभाजीराजे यांनी समाजाला शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचे पालन करुन हे आंदोलन करण्यात यावे असेही त्यांनी सांगितले आहे. कोल्हापुरात शाहू समाधीस्थळावरुन ते संवाद साधत होते.

संभाजीराजे म्हणाले की, कोल्हापुराला वैचारिक, पुरोगामी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे या आंदोलनाची सुरुवात कोल्हापुरातून करत आहोत. त्याचबरोबर त्यांनी शांततेत आंदोलन पार पाडण्याचे आवाहनही केले आहे. संभाजीराजे म्हणाले, आंदोलनादरम्यान कोणीही कोणत्याही लोकप्रतिनिधींना काहीही उलटसुलट बोलू नये. त्यांचा मान-सन्मान राखून त्यांच्याशी वागा. हे मूक आंदोलन शिस्तीत पार पाडायला हवे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी