VIDEO : खासदार सुजय विखे साहेब, ‘हे घ्या तुमचे दोन हजार रुपये परत’

लयभारी न्यूज नेटवर्क
अहमदनगर / संगमनेर : पालकमंत्री साहेब तुमच्या तालुक्याची यादी काढा. हे जे लोक त्यांच्या (रोहित पवारांच्या) मेळाव्यात जातात ना त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा मोदी साहेबांनी दोन दोन हजार रूपये मागच्याच महिन्यात टाकलेले आहेत. जर तुम्हाला मोदींचे दोन हजार रूपये चालतात तर मग तुम्हाला कमळ का चालत नाही ? असे संतापजनक वक्तव्य करणाऱ्या भाजपा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निषेधार्थ “हे घ्या तुमचे दोन हजार रूपये” म्हणत अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरीपुत्रांनी खासदार विखेंच्या नावे २ हजार रुपयांचा चेक पाठवून देत आनोखी गांधीगिरी केली.तरूणांच्या या कृतीतून जिल्ह्यातील सामान्य माणसाच्या स्वाभिमानी अन कणखर बाण्याचेच दर्शन घडल्याची भावना सोशल मिडीयावर जोरदारपणे चर्चिली जात आहे.
ऐका सुजय विखे पाटील काय म्हणाले होते

अहमदनगर दक्षिणेचे खासदार डाॅ सुजय विखे पाटील यांनी पालकमंत्री प्रा राम शिंदे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी (दि 4 रोजी) कर्जतमध्ये आयोजित जाहिर सभेत बोलताना “जर कमळ चालत नसेल तर काढून टाका दोन हजार रूपये” आमच्या या गरिबांना कामाला येतील. सध्या राजकीय नैतिकता मरून गेलेली आहे. वैचारिकता मरून गेलेली आहे. पाहिजे सगळं. नाही कुणालाच म्हणायचं नाही अशी सध्याची स्थिती असल्याचे विखे म्हणाले होते. विखेंच्या वक्तव्याचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदारपणे व्हायरल झाला आहे. विखेंच्या शेतकरी विरोधी त्या वक्तव्याचे कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघासह राज्यात जोरदारपणे पडसाद उमटले. अनेकांनी सोशल मीडियावर खासदार विखेंच्या वक्तव्याचा खरपुस शब्दांत समाचार घेत निषेध नोंदवला. विखेंना नेटीझन्सकडून गेल्या तीन चार दिवसांपासून जोरदार ट्रोल करण्यात येत आहे.
त्यातच अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर भागातील शेतकरी पुत्र असलेल्या संवेदनशील तरूणांनी खासदार विखेंच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी थेट विखेंच्या नावे दोन हजारांचा चेक तयार करून हे घ्या तुमचे दोन हजार परत असे ठणकावून सांगितले. तरूणांनी खासदार विखेंना पाठवण्यासाठी बनवलेल्या चेक बरोबरच एक निवेदनही माध्यमांकडे प्रसिध्द दिले आहे. या निवेदनात तरूणांनी म्हटले आहे की, “आम्ही सुजय विखेंना दोन हजार रुपये पाठवत आहोत. त्यांनी लोणीमध्ये कमळ सोडून अन्य कुणालाही मत द्यावं”, असं आवाहन या निवेदनातून करण्यात आलं आहे. संगमनेरच्या तरूणांनी विखेंच्या वक्तव्याचा अनोख्या पध्दतीने निषेध नोंदवत अहमदनगर जिल्ह्यातील सामान्य जनतेचा कणखर बाणा अन स्वाभिमान अजूनही ताठ मानेने जिवंत हेच दाखवून दिले अशी चर्चा सोमवारी दुपारपासून सोशल मिडीयावर चर्चिली जात होती. खासदार विखेंना पाठवलेला चेक व निवेदन सोशल मिडीयावर जोरदार वायरल होत आहे.
तुषार खरात

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

12 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

13 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

14 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

15 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

15 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

16 hours ago