राजकीय

प्रकाश आंबेडकर म्हणाले, अगोदर अजित पवारांना फटकारले, आता पार्थला; म्हणजे काहीतरी गौडबंगाल आहे

टीम लय भारी

मुंबई : अगोदर अजित पवारांना फटकारले. आता पार्थला फटकारले, म्हणजे काहीतरी गौडबंगाल आहे, असे सूचक विधान ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केले आहे ( Prakash Ambedkar jibed on Sharad Pawar ).

प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी पार्थ पवारबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, आंबेडकरांनी सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली ( Prakash Pawar comented on Ajit Pawar and Parth Pawar ).

सरकारकडून अद्याप ‘लॉकडाऊन’ उठवला जात नसल्याबद्दल ॲड आंबेडकर यांनी जोरदार हल्लाबोल केला. राज्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरळीत व्हायला हवी. राज्यातील सर्व मंदिरे खुली व्हावीत. यासाठी सर्व साधुसंतांना पाठिंबा देण्यात येईल, अशी माहिती आंबेडकर यांनी यावेळी दिली ( Prakash Ambedkar said, Thackeray government should open temples ).

हे सुद्धा वाचा

शरद पवारांच्या बंगल्यावर ‘कोरोना’, १२ रूग्ण सापडले

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती

पार्थ पवारांच्या नावाने लोकांना मदतीचा हात

पवार साहेब, टिकवाल ना पाच वर्षे सरकार ?

भाजप म्हणजे संघटित डाकू, तर काँग्रेस – राष्ट्रवादी भुरटे चोर : प्रकाश आंबेडकर

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर निशाणा, काँग्रेस – राष्ट्रवादीच्या समर्थनार्थ केले ‘हे’ वक्तव्य

ते पुढे म्हणाले की, बेस्ट शंभर टक्के चालू असल्याची बातमी खोटी आहे. ज्या लहान बसेस कंत्राटी पद्धतीवर आहेत, त्या पूर्ण चालू आहेत. पण बेस्टच्या मालकीच्या केवळ १५ टक्के बसेस चालू आहेत. कंत्राटदारांच्या बसेस चालू असल्यामुळे बेस्टचा तोटा होत आहे. याचा खुलासा सरकारने केला पाहिजे. असे आव्हानही प्रकाश आंबेडकर यांनी दिले.

एसटी महामंडळ हे खासगीकरणाच्या मार्गावर आहे. एसटी महामंडळामध्ये वाहक – चालकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. त्याबाबत कामगारांना आम्ही काही सूचना केलेल्या आहेत.

वंचित बहुजन आघाडी एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना आवाहन करते की, तुम्ही एक दिवस गाड्या बाहेर काढण्यासाठी हजर रहा. गाड्या जास्त दिवस आतमध्ये बंद राहिल्या की खराब होतात. राज्यात आंतरराज्य जिल्हा बंदी आहे. ही जिल्हाबंदी हटवावी आणि नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी द्यावी.

दिल्लीत केवळ मेट्रो बंद आहेत. मात्र इतर सर्व वाहतूक चालू आहे. उत्तर प्रदेश मध्येही वाहतूक सेवा चालू आहेत. मग या बाबतीत महाराष्ट्र मागास राहू नये, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला केली आहे. लवकरात लवकर वाहतूक चालू करा नाही तर पुन्हा आम्ही आंदोलन करु असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

मंदिर चालू करण्याबाबत पत्रकारांनी विचारले असता आंबेडकर म्हणाले की, मी स्वतः अकोल्यातील मंदिर खुले करून आलो आहे. आता त्या ठिकाणी कावडही निघाली आहे. तिथे कोरोनाचा एकही रुग्ण निघाला नाही. साधू संतांची जी मागणी आहे, ती सरकारने मान्य करावी. पंढरपूर येथे संत आंदोलन करणार आहेत त्यांना मी शब्द दिला आहे मी देखील त्यांच्यासोबत आंदोलनात उतरणार आहे ( Prakash Ambedkar will participate in Pandharpur agitation ).

येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा
तुषार खरात

Recent Posts

द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर उपाययोजना कराव्या; मंत्री छगन भुजबळ

नाशिक शहरातील द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी (avoid traffic) टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर द्वारका…

8 hours ago

नाशिकमध्ये मतदान केंद्र प्रमुखाला धमकी; नाशकात पती-पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

नाशिक लोकसभा मतदारसंघात काल (दि. 20) मतदानाची प्रक्रिया पार पडली. के के वाघ इंग्लिश स्कूल,…

8 hours ago

पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा: अतुल लोंढे

पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…

9 hours ago

भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजना !

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…

12 hours ago

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

13 hours ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

13 hours ago