राजकीय

अनिल देशमुख, परमबीर सिंग गायब आहेत का ?, प्रवीण दरेकर यांचा सवाल

टीम लय भारी

मुंबई :  वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंह हे गायब आहेत का? असा सवाल भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी हा सवाल उपस्थित केला आहे (Praveen Darekar’s question to NCP).

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी सापडलेली स्फोटके आणि १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपावरून अनिल देशमुख आणि परमबीर सिंह हे तपास यंत्रणांच्या रडारवर होते. मात्र आता ते गायब आहेत अशा चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये पसरल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या मराठवाडा दौऱ्यावर भाजपचा सवाल

शरद पवारांनी काँग्रेसमध्ये यावे, बाळासाहेब थोरातांच्या वक्तव्याचा विजय वडेट्टीवार यांच्याकडून पुनरुच्चार

परंतु, देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकारी व महत्वाचे नेते असल्यामुळे ते कुठे आहेत हे पक्षाला माहीत असायला हवे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अनिल देशमुख नक्की कुठे आहेत हे सांगणे गरजेचे आहे. असा सवाल प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी पक्षाला केला आहे. देशमुख मतदारसंघात आहेत, मुबंईत आहेत की इतर ठिकाणी आहेत. याचा शोध सीबीआय आणि ईडी घेतीलच असेही दरेकर म्हणाले (Since Deshmukh is an ally and important leader of the NCP, the party should know where he is).

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अनिल देशमुख नक्की कुठे आहेत हे सांगणे गरजेचे आहे

सहकार मंत्र्यांच्या पुतणीचा काँग्रेस आमदार पीएन पाटील यांच्यासह मुलाकडून छळ

Local body polls in Maharashtra: NCP to project Chhagan Bhujbal to counter BJP’s strategy to win over OBCs

त्याचबरोबर मुंबईचे पोलीस आयुक्तसुद्धा सापडत नाहीत. राज्याच्या गृहमंत्र्यांना त्यांच्या ठावठिकाणांचा पत्ता असणे अपेक्षित आहे. राज्यात अशा प्रकारची गोंधळाची स्थिती निर्माण झाली असेल तर राज्याच्या गृह विभागात काय चालले आहे हे समोर येत असल्याचे दरेकर म्हणाले.

कीर्ती घाग

Recent Posts

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

60 mins ago

नवरात्रीच्या उपवासात शेंगदाणे खाण्याचे फायदे, जाणून घ्या

3 ऑक्टोबर 2024 पासून देशभरात नवरात्रीचा सण सुरू होत आहे, आणि हा सण 11 ऑक्टोबर…

2 hours ago

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी प्या हर्बल ड्रिंक

अनावश्यक वजन वाढणे आणि हार्मोनल चढउतार ही थायरॉईड वाढण्याची लक्षणे आहेत. थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची…

2 hours ago

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे शेंगदाणे, जाणून घ्या फायदे

शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…

23 hours ago

युजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…

23 hours ago

वजन कमी करण्यापासून ते त्वचा उजळण्यापर्यंत लिंबू पाणीचे आहे अनेक फायदे

वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आहारापासून…

24 hours ago