राजकीय

‘तो’ बॉम्बस्फोट म्हणजे राहुल गांधींना संपवण्याचा कट तर नाही ना? नाना पटोलेंचा गंभीर आरोप

टीम लय भारी

मुंबई :- खासदार राहुल गांधी जम्मू-काश्मीर दौऱ्यावर गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला? राहुल गांधींना संपवण्याचा कट तर नाही ना? असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. नाशिकमध्ये ‘व्यर्थ ना हो बलिदान’ कार्यक्रमात बोलताना नाना पटोले यांनी राहुल गांधींच्या सुरक्षेसंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्र सरकारवर निशाणा साधला (Rahul Gandhi isnt it Serious allegations of Nana Patole).

राहुल गांधी दोन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. दरम्यान नाना पटोलेंच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. श्रीनगर येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांशी संवादही साधला.

मंत्र्यांची संख्या वाढली; पण कोरोना लसीची नाही, राहुल गांधीचा मोदींना टोला

अतिवृष्टीने बेहाल जनतेच्या मदतीसाठी कॉंग्रेसचे कार्यकर्ते सरसावले, नाना पटोलेंनी केले कौतुक

परंतु, राहुल गांधी थांबले होते, तिथपासून केवळ ५०० मीटरवर बॉम्ब हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. यावरून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शंका उपस्थित केली आहे. राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला? राहुल गांधींना संपवण्याचा कट तर नाही ना, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे (Such a serious allegation has been made by Nana Patole).

स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी ‘व्यर्थ न हो बलिदान’ हा कार्यक्रम हुतात्मा स्मारकात घेण्यात आला. यावेळी पटोले बोलत होते. कार्यक्रमास राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी राहुल गांधींच्या सुरक्षेसंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्र सरकारवर निशाणा साधला.

…तर देशात लसीकरणाची अशी स्थिती राहिली नसती : राहुल गांधी

‘Is it a conspiracy to end Rahul Gandhi?’: Nana Patole questions Srinagar grenade attack

काश्मीरमधील धर्मस्थळांना भेट

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील खीर भवानी मंदिराला तसेच हजरतबाल या मुस्लिमांच्या धार्मिक स्थळास भेट दिली. गांधी यांचे दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीर भेटीसाठी सोमवारी आगमन झाले. नंतर ते सकाळी चिनार वृक्षांच्या रम्य परिसरात असलेल्या खीर भवानी मंदिरात गेले. तुल्लामुल्ला भागात मध्य काश्मीर जिल्ह्य़ात हे मंदिर आहे.

राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला

राहुल गांधी जम्मू काश्मीरमध्ये गेले आहेत. तिथे ते गेले अन् बॉम्बस्फोट झाला. ते तिथून गेले होते म्हणून बरे झाले. राहुल गांधी जिथे थांबले होते तिथून ५०० मीटर अंतरावर हा बॉम्बस्फोट झाला. जम्मू काश्मिरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू असून तेथील सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. राहुल हे देशभरातील जनतेचा आवाज बनले असून, हा हल्ला म्हणजे त्यांना संपविण्याचा कट तर नाही ना, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला.

राहुल गांधी आणि नाना पटोले

भाजपपासून काँग्रेसच देशाला वाचवू शकते

नोटाबंदी झाल्यावर दहशतवाद संपेल असे यांनी सांगितले होते. पण मग दहशतवाद संपला का? नोटाबंदीचे सोडून द्या पण मग तुमच्याकडे इतकी मोठी यंत्रणा असताना दहशतवादी राहुल गांधी होते तिथपर्यंत कसे काय येऊ शकले, अशी विचारणा करत गांधी घराणे देशाचा आवाज बनले असून लोकशाहीची मूल्ये आणि संविधानाची मोडतोड करणाऱ्या भाजपपासून काँग्रेसच देशाला वाचवू शकते, असे नाना पटोले म्हणाले (Only Congress can save the country from BJP, said Nana Patole).

तसेच, ब्रिटिश राजवटीत जालियनवाला बाग हत्याकांडात अनेकांचा बळी गेला. परंतु, कोरोना संकट काळात पवित्र गंगा नदीतून अनेक हिंदू बांधवांचे मृतदेह वाहून गेले. गंगा नदी मलिन करण्याचे काम सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारामध्ये मश्गूल होते. देशात चाललेले मृत्यूचे तांडव बघत होते. जालियनावाला बागमध्ये जेवढे लोक मारले गेले नाहीत तेवढे बळी कोरोना काळात केंद्र सरकारने घेतल्याचा आरोपही पटोले यांनी केला.

Rasika Jadhav

Recent Posts

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

8 mins ago

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

23 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

2 days ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago