31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयमंत्र्यांची संख्या वाढली; पण कोरोना लसीची नाही, राहुल गांधीचा मोदींना टोला

मंत्र्यांची संख्या वाढली; पण कोरोना लसीची नाही, राहुल गांधीचा मोदींना टोला

टीम लय भारी

नवी दिल्ली :- देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरण वाढवणे गरजेचे आहे. कॉंग्रेस नेते राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोरोना लसीकरणावरून राहुल गांधींनी मोदी सरकारला खोचक टोला लगावला आहे (Rahul Gandhi has slammed the Modi government).

काही राज्यांत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा चार लाखांवर पोहोचला आहे (The death toll from the corona has risen to four million).

येत्या वर्षात महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुयारी मार्ग तयार होणार

पृथ्वीच्या दिशेने येत आहे एक सौरवादळ

“मंत्र्यांची संख्या वाढली आहे, कोरोना लसीची नाही” असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला खोचक टोला लगावला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे. “मंत्र्यांची संख्या वाढली आहे, कोरोना लसीची नाही!” असे म्हणत कोरोना लसी कुठे आहेत असा सवालही त्यांनी केला.

राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये एक फोटो ट्विट केला आहे. ज्यामध्ये देशातील कोरोना लसीकरणासंदर्भातील आकडेवारी देण्यात आली आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी डिसेंबर 2021 पर्यंत देशात 60 टक्के लोकसंख्येला कोरोना लसीकरणाचे 2 डोस देणे आवश्यक आहे असे राहुल गांधी म्हटले आहे.

Rahul Gandhi has slammed the Modi government
राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी

एमपीएससी बंद करा…

“Number Of Ministers Increased, Not Of Vaccines”: Rahul Gandhi’s Jibe At Centre

दररोज किमान 88 लाख जणांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. परंतु मागील 7 दिवसांत दररोज सरासरी केवळ 34 लाख जणांनाचे लसीकरण केले जात आहे. दुसरीकडे गेल्या 7 दिवसांत दररोज सरासरी 54 लाख लसींचा तुटवडा आहे अशी माहिती राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये आहे.

“केंद्र सरकारची लसीकरण रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही…शेवटी काही मोजक्या उद्योगपतींचा फायदा होणार” असे म्हणत काही दिवसांपूर्वी राहुल यांनी टीकास्त्र सोडले होते. “केंद्र सरकारची लसीकरण रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही. सर्वसामान्य माणूस रांगा लावणार. संपत्ती, आरोग्य आणि आपला जीव गमावणार. आणि शेवटी काही मोजक्या उद्योगपतींचा फायदा होणार” असे राहुल गांधी यांनी म्हटले होते (In the end, only a few industrialists will benefit, “said Rahul Gandhi).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी