राजकीय

शिंदे गटातील आमदारांना रुचेना नवा सत्ताप्रयोग; रायगडातून अदिती तटकरेंबदद्ल नाराजी

राज्यात गेल्यावर्षी मोठे सत्तानाट्य घडून आले, शिवसेनेला खिंडार पाडून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात घातली. त्यानंतर आता पुन्हा अजित पवार यांनी राष्ट्रवादीत मोठा भूकंप घडवून आणत उपमुख्यमंत्रीपदावर ते आरुढ झाले आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या मातब्बर अशा आठ आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज झाले आहेत.

रायगड जिल्ह्यातील शिंदे गटाचे आमदार मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. मात्र राष्ट्रवादीच्या अदिती तटकरेंना कॅबिनेट मंत्री केल्याने रायगडातील शिंदे गटाचे आमदार कमालीचे नाराज झाले आहेत. गेल्यावर्षी शिवसेनेला खिंडार पडले तेव्हा रायगडातील शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे हे तीघेही शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले. त्यानंतर भरत गोगावले यांना शिंदेगटाचे प्रतोद नेमन्यात आले.

महाविकास आघाडीमध्ये तटकरे कुटुंबातील आदिती तटकरे यांना मंत्रीपद देण्यात आले होते. तसेच त्या रायगडच्या पालकमंत्री देखील होत्या त्यामुळे रायगडातील शिवसेनेचे तीनही आमदार नाराज होते. शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी राष्ट्रवादीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसेच अदिती तटकरे यांच्याबद्दल देखील त्यांनी तक्रारीचा सुर व्यक्त केला होता.

वर्षभरापूर्वी शिंदे यांनी सत्तांतर घडवून आणल्यानंतर रायगडातील शिंदे गटाच्या आमदारांपैकी गोगावले यांना मंत्रीपदावर नियुक्त केले जाईल अशी मोठी आशा होती. त्यांना रायगडचे पालमंत्री होण्याची देखील इच्छा होती. मात्र आता झालेल्या नव्या सत्ताप्रयोगानंतर त्यांची धाकधूक वाढली आहे. अदिती तटकरे यांना मंत्रीपदाची शपथ दिल्यानंतर शिंदे गटातील आमदार हिरमुसले आहेत. मंत्रीपदाची आस असलेल्या गोगावलेंनी आता भाकरी अर्धीअर्धी वाटून खावी लागणार असल्याचे म्हटले आहे. तर महेंद्र थोरवे यांनी रायगडचे पालकमंत्री म्हणून अदिती तटकरे यांना स्विकारणार नसल्याचे स्पष्टच सांगून टाकले आहे. हा सत्ताप्रयोग फायद्याचा असला तरी तटकरेंना पालकमंत्री म्हणून त्यांचा विरोध आहे.

हे सुद्धा वाचा

अजित पवारांच्या आमदारांची संख्या अजून कळेना

जयंत पाटलांचे भाचे प्राजक्त तनपुरे अजितदादांच्या भेटीला; इकडे सोनाली तनपुरे यांचे महत्त्वाचे ट्विट

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नवी डोकेदुखी; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अनुभवानुसार खाती पाहिजेत

दरम्यान रायगडातील या तीनही आमदारांना मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर विश्वास असून ते यातून मार्ग काढतील अशी आशा आहे. आगामी काळात एकनाथ शिंदे आपल्या गटातील किती आमदारांना मंत्रीपद देऊ शकतात हे पाहणे देखील औत्सुक्याचे असणार आहे. त्यातही तटकरेंवर नाराजी असलेल्या आमदारांपैकी कुणाला रायगडचे पालकमंत्रीपद देतात की पुन्हा आदिती तटकरे यांनाच पालकमंत्रीपद मिळणार हे देखील पहावे लागणार आहे. सध्या रायगडचे पालकमंत्रीपद उदय सामंत यांच्याकडे आहे. रायगडातील शिंदे गटातील आमदार आणि तटकरे यांच्यातील नराजीमुळे हे पद सामंत यांच्याकडेच ठेवले जाईल का? हे देखील पहावे लागणार आहे.

 

प्रदीप माळी

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

9 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

11 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

11 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

12 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

12 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

12 hours ago