31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयअजित पवारांच्या आमदारांची संख्या अजून कळेना

अजित पवारांच्या आमदारांची संख्या अजून कळेना

अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसला भगदाड पाडले या घडामोडीला 48 तास उलटून गेल्यावरही अजित पवार यांना समर्थन दिलेल्या आमदारांची यादी अद्याप विधानभवनापर्यंत पोहचलेली नसल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यापैकी कोणासोबत किती आमदार आहेत हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी शरद पवारांच्या गटाकडून सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कोणाकडे किती संख्याबळ आहे हे काही कळत नाही. दरम्यान उद्या शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. अजित पवार यांच्या गटाची बैठक बांद्रा येथील छगन भुजबळ यांच्या मालकीच्या महाविद्यालतात होणार असून काका-पुतणे या वेगवेगळ्या बैठकीत आपले पत्ते काढण्याची शक्यता आहे,

अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. आणि अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या 40 आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याचे बोलले जाते. असे असले तरीही अजित पवार यांना समर्थन दिलेल्या आमदारांची यादी अद्याप विधानभवनापर्यंत पोहचलेली नसल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यापैकी कोणासोबत किती आमदार आहेत हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

राष्ट्रवादी पक्षाचे खासदार आणि सध्या अजित पवार गटात असलेले प्रफुल्ल पटेल यांना “तुमच्यासोबत किती आमदार आहेत याचा आकडा सांगा’, असा प्रश्न विचारला असता. बहुसंख्य लोक आमच्यासोबत आहेत. असे म्हटले आहे. पण या प्रश्नावर प्रतिप्रश्न करत त्यांनी विचारल की त्यांनी त्यांच्याकडे (शरद पवार) किती लोक आहेत ते सांगावे. त्यामुळे 5 जुलैपर्यंत संख्याबळाबाबत स्पष्टता येणार नाही. हे स्पष्ट झाले आहे. याच कारणामुळे अजित पवार गटाने अजूनही समर्थक आमदारांची यादी आणि संख्या याबाबतची माहिती विधानसभा अध्यक्षांना दिलेली नाही. यामुळे अजित पवार यांना राष्ट्रवादीचे गटनेते नेमताना त्यांच्या नावापुढे सत्तारूढ पक्ष की विरोधी पक्ष लिहावे, अस पेच अध्यक्षांसमोर निर्माण झाला आहे.

हे सुद्धा वाचा:

जयंत पाटलांचे भाचे प्राजक्त तनपुरे अजितदादांच्या भेटीला; इकडे सोनाली तनपुरे यांचे महत्त्वाचे ट्विट

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नवी डोकेदुखी; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अनुभवानुसार खाती पाहिजेत

धुळे- मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, 12 जणांचा जागीच मृत्यू

अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली यानंतर राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट तयार झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्हीवर दावा केला. अजित पवार यांनी पक्षात फुट पाडल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले. विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करण्याच्या अधिकार हा पूर्णपणे विधानसभा अध्यक्षांचा आहे. विरोधी पक्षांचे संख्याबळ पाहून अध्यक्ष यासंदर्भातील निर्णय घेतात. पण आत्ताची परिस्थिति पाहता राष्टवादीचे काही आमदार सत्तेत असणाऱ्या पक्षासोबत गेल्याने त्यांचे संख्याबळ कमी झाले आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीसाठी दिलेल्या पत्रावर निर्णय घेण्यासाठी शरद पवार गटाकडून संख्याबळाची यादी मागविली जाणार असल्याचे कळते आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी