राजकीय

राजाभाऊ वाजे १४ कोटीं ८० लाखांचे धनी

नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार पराग (राजाभाऊ) वाजे (Rajabhau Waze) यांच्याकडे जंगम (चल) व स्थावर (अचल) अशी एकूण १४ कोटी ८० लाखांची संपत्ती ( worth Rs 14.80 crore) आहे. विशेष म्हणजे यातील १३ कोटी २७ लाख ९१ हजारांची मालमत्ता ही त्यांची वडिलोपार्जित असून, राजाभाऊंनी स्वत: ३५ लाख रुपयांची संपत्ती गेल्या पाच वर्षांत खरेदी केली आहे. सद्यस्थितीला त्यांच्याकडे एक कोटी ५२ लाखांची जंगम मालमत्ता तर, ३५ लाखांची स्थावर मालमत्ता असल्याचे त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. (Rajabhau Waze worth Rs 14.80 crore )

माजी आमदार राजाभाऊ वाजेंनी एसबीआय व पतसंस्थेकडून १९ लाख १८ हजारांचे कर्ज घेतले आहे. २०१९ च्या सिन्नर विधानसभा निवडणुकीत त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे ७६ लाख सहा हजारांची जंगम मालमत्ता होती. पाच वर्षात यात दुपटीने वाढ होवून एक कोटी ५२ लाखांवर ही मालमत्ता पोहोचली आहे. स्थावर मालमत्तेचा विचार केला तर २०१९ मध्ये त्यांच्याकडे आठ कोटी ६७ लाख ६९ हजारांची मालमत्ता होती. यात वडिलोपार्जित मालमत्तेचाही समावेश होता. वाजेंना वारसाने मिळालेल्या जमिनी, पेट्रोल पंपांच्या किमतीत वाढ झाल्याने एकूण १३ कोटी २८ लाखांवर पोहोचली आहे. राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था यांमध्ये १५ लाखांच्या जवळपास मुदतठेवी त्यांच्या नावे आहेत. तर दोन लाख ७१ हजारांचा वैयक्तिक विमाही त्यांनी उतरवला आहे..त्यांच्या नावावर कोणताही गुन्हा दाखल नाही.

सहा वाहने आणि एक कंपनी
बुलेट, टॅक्टर, ॲक्टिव्हा, स्कॉर्पिओ, होंडा सिटी, इनोव्हा अशा गाड्या त्यांच्याकडे असून, ५७ हजार ६०० रुपयांचे सोने त्यांच्याकडे आहे. पत्नीच्या नावे १६ लाख २० हजारांचे (२२५ ग्रॅम) सोने असून, पेट्रोलपंप व फामर्स प्रोड्युसर कंपनीही त्यांच्या नावे आहे. ७० हजारांची रोख रक्कम राजाभाऊंकडे आहे. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात राजाभाऊंनी ३५ लाखांची मालमत्ता खरेदी केल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे.

अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांच्याकडे ८४ लाखाची मालमत्ता
नाशिक लोकसभा मतदारसंघात जयश्री महेंद्र पाटील यांनी सैनिक समाज पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्याकडे सहा लाख नऊ हजारांची जंगम मालमत्ता तर, सात लाख ५५ हजारांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या एकूण संपत्तीचे बाजार मूल्य ८४ लाख इतके असून त्यांच्या पतीच्या नावे ५७ लाखांची संपत्ती असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

भास्कर भगरे यांच्याकडे ६५ लाखांची संप्पती ; १७ तोळे सोने
भास्कर भगरे यांच्याकडे रोख रक्कम २.५ लाख रुपये असून त्यांच्या पत्नी लक्ष्मी भगरे यांच्याकडे २ लाख रोख रक्कम दाखविण्यात आली आहे. भास्कर भगरे यांच्याकडे विविध बँकात एकूण ४३ लाख ७७ हजार १८८ रक्कमेच्या मुदत ठेवी असून त्यांच्या पत्नी कडे ३७ लाख ९१ हजार ८९४ रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. स्थावर मालमत्तेमध्ये शेतजमीन आणि बिगर शेती शेतजमीन यामध्ये २१ लाख ४१ हजार तर त्यांच्या पत्नीच्या नावे ७१ लाख ४० हजार ७४५ मूल्यांच्या जमिनी आहेत.त्यांच्या नावावर २१ लाख १७ हज्रार १०० रुपयांचे कर्ज असून त्यांच्या पत्नीच्या नावे ३ लाख २६ हजार ४८० रुपयांचे कर्ज आहे.त्यांच्या नावावर कोणताही गुन्हा दाखल नाही.

टीम लय भारी

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

1 hour ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

2 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

2 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

3 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

3 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

5 hours ago