उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये झाडाच्या बुंध्यांना कांक्रीटीकरण

स्मार्ट सिटीच्या सुशोभीकरणासाठी पदपथांचे काम करताना अनेक झाडाच्या बुंध्याला ( tree trunks) सिमेंटचा (Concretisation) वेढा घातल्याने शहरातील अनेक झाडे धोक्यात आली आहेत. त्यामुळे स्थानिक झाडे कोसळण्याचे प्रमाण वाढले असल्याचे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदवले आहे.तर याच विषयासंदर्भात मनपाच्या विरोधात जिल्हा न्यायालयात अवमान याचिका देखील दाखल करण्यात आल्याचे पर्यावरण प्रेमी निशिकांत पगारे यांनी सांगितले.विशेष म्हणजे यातील अनेक झाडांना चक्क जिलाधिकारी कार्यालय निवासस्थान परीसरात सिमेंटचा वेढा घालण्यात आले आहे.(Concretisation of tree trunks in Nashik )

शहरात पावसाळ्यात विविध भागांत अनेक झाडे पडतात तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळतात . ही झाडे पडण्यास केवळ वादळी पाऊस जबाबदार नसून, गेल्या काही वर्षांत महापालिकेने रस्ते आणि पदपथाची केलेली स्मार्ट कामे जबाबदार असल्याची टीका पर्यावरण अभ्यासकांनी केली आहे. शहराच्या चारीबाजूला रस्त्यांचे काँक्रिटीकरण (Concretisation) सुरू आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठीदेखील रिकामी जागा ठेवलेली नाही. त्यामुळे झाडाच्या मुळांना पुरेसे पाणी मिळत नाही. काँक्रिटच्या घेरामुळे त्यांच्या वाढीवर मर्यादा आल्या आहेत. प्रत्यक्षात झाडाच्या खोडाभोवती दीड ते दोन फूट व्यासाची वर्तुळाकार जागा ठेवणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही , हा नियम महापलिकाच नाही तर सर्वच शासकीय विभाग धाब्यावर बसवत असल्याचे चित्र आहे .

झाड जितके मोठे असते तेवढाच झाडाच्या मुळांचा परीघ जमिनीमध्ये पसरलेला असतो. रस्त्यांची कामे करताना अनेकदा कर्मचाऱ्यांकडून जमिनीखालील मुळांचा पसारा कापला जातो. अशा वेळी ते झाड जागा मिळेल, तसे वाढत जाते. जी झाडे त्यांची मुळे विस्तारू शकत नाहीत, ती कमकुवत होतात. फांद्यांना पेलण्याची ताकद कमी पडते. त्यातच ज्या बाजूची मुळे कापली गेली, त्याच बाजूच्या फ़ांद्या कापल्या गेल्यास झाड टिकत नाही. वादळी वाऱ्यात अशी झाडे कोसळतात. ठिकठिकाणी झाडांना गोल आळी करण्याऐवजी कर्मचाऱ्यांनी झाडांच्या खोडापर्यंत काँक्रिटचे थर चढवले आहेत. त्यामुळे झाडांच्या वाढीवर मर्यादा आल्या आहेत हे मनपाने थांबवले पाहिजे असे पर्यावरणप्रेमी रमेश अय्यर यांनी सांगितले.

सिमेंट काढण्यासाठी मोहीम राबवणे गरजेचे
काही वर्षांपूर्वी पर्यावरण प्रेमींनी शहरात काही रस्त्यांवर झाडांना मुळांना लावलेले काँक्रिट फोडून संरक्षक आळी केली होती. मात्र स्मार्ट सिटीच्या नावाने गेल्या काही वर्षांत शहरात अनेक ठिकाणी पदपथांचे सुशोभीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने अशा बंदिस्त झाडांचे सर्वेक्षण करून पुन्हा एकदा व्यापक मोहीम राबविण्याची गरज आहे.तसेच पावसाळा सुरु होण्यापूर्वी धोकादायक झाडांची माहिती घेतली पाहिजे अशी अपेक्षा शहरातील नागरिक व्यक्त करत आहेत,

अवमान याचिकेची जूनमध्ये सुनावणी
सन २०१७ मध्ये याच विषयावर मी नाशिक जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. असे असताना देखील नाशिक महापालिका हा विषय गांभीर्याने घेत नाही हि दुर्देवी बाब आहे. त्यामुळे अवमान याचिका दाखल केली असून जून मध्ये त्याची सुनावणी आहे
निशिकांत पगारे , याचिकाकर्ते

टीम लय भारी

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

49 mins ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

1 hour ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

2 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

2 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

2 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

5 hours ago