राजकीय

IAS राजेश देशमुख यांचा दणका, राष्ट्रीयकृत बँकांवर कारवाईची कुऱ्हाड

टीम लय भारी

मुंबई : पीक कर्जाचा 100 टक्के वाटप करा नाहीतर सर्व शासकीय बँक खाती बंद करण्याचा इशारा पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांनी राष्ट्रीयकृत बँकांना दिली आहे. यामुळे पहिल्यांदाच राष्ट्रीयकृत बँकांनी 100 टक्के कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंतच्या कर्जापैकी मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करण्यात आले आहे.पुणे जिल्ह्याने किसान क्रेडिट कार्ड म्हणजे पीक कर्ज वाटपामध्ये सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात जिल्ह्याच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात जास्त कर्ज वाटप करुन ऐतिहासिक कामगिरी केली आहे. (Rajesh Deshmukh’s action against nationalized banks)

यावर्षी एकूण ३ हजार ८९२ कोटी ४० लाख रुपये इतके कर्ज वाटप जिल्ह्यात झाले असून ३ लाख ७७ हजार ४१० शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांनी स्वत: पुढाकार घेत सर्व बँकांशी संपर्क साधत कर्जवाटपातील अडचणी दूर करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यामुळे हे शक्य झाले आहे.

कर्ज वाटपाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी जून महिन्यापासून सर्व बँकांकडे वेगवेगळ्या स्तरावर पाठपुरावा करण्यात आला होता. खरीप हंगामामध्ये २ हजार ७५८ कोटी ८२ लाख रुपयांच्या उद्दिष्टापेक्षा १८१ कोटी ८० लाख रुपयांनी कमी कर्जवाटप झाले होते. ही तफावत रब्बी हंगामातील कर्जवाटपाद्वारे दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख (Rajesh Deshmukh) यांनी वेळोवेळी पीक कर्जाचा स्वतंत्र आढावा घेऊन सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीयकृत बँका, खासगी क्षेत्रातील बँका तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जास्तीत जास्त पीक कर्जवाटपासाठी प्रोत्साहित केले. कर्जवाटप प्रक्रीयेतील अडचणीदेखील दूर करण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले आणि प्रसंगी संबंधितांना आदेश दिले. या सर्व प्रक्रियेत जिल्हा अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्रीकांत कारेगांवकर यांनीदेखील मोलाची भूमिका बजावली आहे.

यापूर्वी २०१५-१६ साली ३ हजार ५०६ कोटी ६१ लाख रुपये इतके कर्ज वाटप झाले होते. त्यापेक्षा ३८५ कोटी ७९ लाख रुपये अधिक पीक कर्जवाटप यावर्षी झाले आहे. यावर्षी ३ हजार ८८२ कोटी रुपये एवढे उद्दिष्ट असतांना त्यापेक्षा १० कोटी ४० लाख रुपये अधिक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी १०४ टक्के कर्ज वाटप करून कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ओलांडले. खाजगी क्षेत्रातील बँकांनी ९९.८१ टक्के कर्ज वाटप केले. तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २ हजार ३३३ कोटी ५५ लाख रुपये कर्ज वाटप करून कर्ज वाटपात मोठी भूमिका अदा केली आहे. बँकेचे अध्यक्ष, पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व शाखांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. यावर्षी महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ४८.०७ टक्के कर्ज वाटप केले. या सर्व कर्ज वाटपामध्ये राज्य स्तरावरील बँकर्स कमिटीच्या सर्व सदस्य बँकांचे जिल्हा समन्वयक तसेच क्षेत्रीय व्यवस्थापक, जिल्हास्तरीय सल्लागार समितीचे निमंत्रक आणि बँक ऑफ महाराष्ट्र पुणे विभागाचे महाव्यवस्थापक राजेश सिंग यांचेही यांचे मोलाचे सहकार्य लाभले, अशी माहिती जिल्हा अग्रणी व्यवस्थापक कारेगांवकर यांनी दिली आहे.


हे सुद्धा वाचा :

Rajesh Deshmukh is appointed as Pune district collector

अजित पवारांनी ‘या’ कारणासाठी डॉ. राजेश देशमुख यांची पुणे जिल्हाधिकारी पदावर केली नियुक्ती

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती

राष्ट्रवादी ३ राज्यांच्या निवडणुका लढणार,शरद पवारांची माहिती

Pratiksha Pawar

Recent Posts

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

11 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

11 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

11 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

12 hours ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

18 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

19 hours ago