राजकीय

उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून घ्यावे, आणी अडीच वर्षांचे मुख्यमंत्री पद दयावे : रामदास आठवले

संदिप रणपिसे : टीम लय भारी

मुंबई :राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी औरंगाबादमध्ये केलेल्या एका वक्तव्यावरून शिवसेना-भाजपच्या संभाव्य युतीच्या चर्चेला नव्यानं तोंड फुटलं आहे (Ramdas Athavale : Match with Uddhav Thackeray, and give him the post of Chief Minister for two and a half years).

याच पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी युतीबद्दल सकारात्मक वक्तव्य केलं आहे. ‘अजूनही वेळ गेलेली नाही, अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर युती होऊ शकते,’ असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

शरद पवारांच्या पुढाकाराने बारामतीसह इतर शहरांत IT सेंटर सुरु

रोहित पवारांनी भारताच्या संरक्षण क्षमतेवर प्रश्न उपस्थित केला

भाजप आणि शिवसेना यांनी युती करावी ही माझी आधी पासून भूमिका आहे. मुख्यमंत्री पदाचा कालावधी दोन्ही पक्षांनी वाटून घेऊन युती करावी असे मी भाजप आणि शिवसेना नेतृत्वाला नेहमी सुचविले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचा माजी सहकारी आणि भावी सहकारी पक्ष असा उल्लेख करून भविष्यात भाजप सोबत युती चे संकेत दिले असून या मुळे भाजप शिवसेना आरपीआय महायुती चा मतदार आनंद व्यक्त करीत असून आपण ही मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचे स्वागत करीत असल्याचे मत नागपूर मध्ये ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले. ‘उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती. मात्र, त्यांनी मांडलेल्या अडीच-अडीच वर्षाच्या प्रस्तावावर शिवसेना-भाजपमध्ये एकमत होऊ शकलं नाही. त्यामुळं जे व्हायला नको होतं, ते झालं. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत त्यांनी आघाडी करणं योग्य नव्हतं,’ असं आठवले म्हणाले. ‘उद्धव ठाकरे हे अत्यंत साधेभोळे आणि चांगले गृहस्थ आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार आहेत. त्यांनी पुन्हा एकदा महायुतीत यावे.

गोव्याच्या राज्यपालांनी नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त केली मोठी घोषणा

युती अजूनही होऊ शकते; वेळ गेलेली नाही फडणवीस हे अभ्यासु नेते असुन आता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून घ्यावे.आणी ही अडीच वर्षांचे मुख्यमंत्री पद दयावे

Ramdas Athawale seeks BJP-RPI alliance in Uttar Pradesh to jointly fight upcoming Assembly polls

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी पुन्हा स्वगृही परतावे,’ असा सल्ला आठवले यांनी दिला. ‘उद्धव ठाकरेंनी महायुतीत यावे आणि देवेंद्र फडणवीसांचे गीत गावे. फडणवीसांनी एक दिवस मातोश्रीवर जावे आणि उद्धवजींना घेऊन परत यावे,’ अशी कविताही आठवले यांनी बोलून दाखवली. देवेंद्र फडणवीस यांचेही कौतुक ना रामदास आठवले यांनी या मुलाखतीत केले आहे. फडणवीस हे अभ्यासु नेते आहेत. आता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून घ्यावे. त्यांना ही अडीच वर्षांचे मुख्यमंत्री पद दयावे असे ना.रामदास आठवले म्हणाले.

Mruga Vartak

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

2 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

2 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

3 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

4 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

5 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

6 hours ago