31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयगोव्याच्या राज्यपालांनी नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त केली मोठी घोषणा

गोव्याच्या राज्यपालांनी नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त केली मोठी घोषणा

टीम लय भारी

पणजी : गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिलाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त मोठी घोषणा केली आहे. पिलाई यांनी राज्यातील ७१ वृद्धाश्रम आणि अनाथालयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे (Governor of Goa made a big announcement on the occasion of Narendra Modi’s birthday).

देशाला दूरदर्शी असलेला नेता, स्वतःला देशाच्या कामात समर्पित करणारा आणि लोकांच्या भल्यासाठी काम करणारे, असे म्हणत पिलाई यांनी मोदींची प्रशंसा केली आहे. त्याचबरोबर कोरोनाकाळातही मोदींनी उत्तमरित्या जबाबदारी सांभाळली असे ही पिलाई म्हणाले.

संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त दिल्या भन्नाट शुभेच्छा

भाजप धरणी ठेकेदाराचा १३ लाखाचा सभागृह घोटाळा उघडकीस

Governor of Goa made announcement on occasion PM birthday
पी. एस. श्रीधरन पिलाई

या व्यतिरिक्त पिलाई यांनी ७१ व्यक्तींना राजभवना तर्फे डायलिसिसच्या उपचाराचा खर्च राज्यपालांच्या राखीव निधीतून देण्यात येणार आहे. ज्या व्यक्तींना किंवा संस्थेला गरज आहे त्यांनी यासाठी आपल्या व्यक्तिगत माहिती टाकून अर्ज करावा. तसेच एखादी व्यक्ती डायलिसिसच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाली असेल तर तेही नोंद करावे असे ही पिलाई म्हणाले. या सुविधांचा लाभ घेण्यासाठी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा

Breaking news: BJP to form govt in Telangana in 2024, says Amit Shah

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी