राजकीय

रोहित पाटील म्हणतात, संघर्ष आम्हाला नवीन नाही

टीम लय भारी

मुंबई : आरआर पाटील यांनाही 20 ते 30 वर्षे राजकारणात संघर्ष करावा लागला. मग ते शिखरावर पोहोचले. संघर्ष आमच्यासाठी नवीन नाही. नगर पंचायत निवडणुकीतही आम्हाला संघर्ष करावा लागला, असे राष्ट्रवादीचे नेते रोहित पाटील यांनी सांगितले. नगर पंचायत निवडणुकीत रोहित पाटील यांच्या दणदणीत विजयाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. यावेळी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली(Rohit Patil says, We had to struggle in the Nagar Panchayat elections).

हा विजय सर्वसामान्य जनतेचा आहे. या विजयाने घरच्यांना खूप आनंद झाला आहे. आम्ही करत असलेल्या कामात ते समाधानी आहेत. परिवारातर्फे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. वडील असते तर मला वेगळे मार्गदर्शन मिळाले असते. वेगळी परिस्थिती निर्माण झाली असती. आबा 20-30 वर्षे राजकारणात संघर्ष करत होते. त्यानंतर ते शिखरावर पोहोचले होते. संघर्ष आमच्यासाठी नवीन नाही. आबा गेल्यानंतर जी परिस्थिती ओढावली होती. आम्ही सगळे त्यातून बाहेर पडलो. या मार्गात त्यांची नेहमीच कमतरता राहिली आहे.

त्यांची शिकवण नेहमीच आमच्यासोबत होती. त्यांचे विचार नेहमीच आमच्यासोबत असायचे. मी रक्ताचा वारस असलो तरी माझ्या वडिलांनी मला विचाराचा वारस बनवले आहे. त्या विचारांच्या वारसदारांच्या बळावर आम्ही पुढे जात आहोत. त्यामुळे आज बाप नाही, असे आम्हाला वाटते, असे रोहितने सांगितले.

हे सुद्धा वाचा

शाब्बास रोहित… खूप खूप अभिनंदन; रोहित पवारांकडून रोहित पाटीलांचे अभिनंदन

दारूच्या दुकानांना देव देवतांची, महापुरूषांची नावे देण्यास बंदी, महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra: MVA outsmarts BJP in Nagar Panchayat elections

मला लहानपणापासून वडिलांचा फारसा सहवास नाही. हे पद सोडल्यानंतर ते काय करणार हे सध्या तरी माहीत नाही. मात्र त्यांनी विकासाचा डोंगर उभा केला आहे. 2014 च्या विधानसभेत साडेपाच ते सहा हजार मतांचे बहुमत होते. एवढी कामे करूनही त्यांना कमी मते मिळण्याची चिंता होती. मात्र याच तालुक्यात गेल्या निवडणुकीत 13 हजार मतांचे बहुमत मिळाले होते. विधानसभेत दिलेली आश्वासने दोन वर्षांत पूर्ण केली. लोकांनी दिलेला शब्द पाळला आहे. जनतेचा आपल्यावरील विश्वास वाढला आहे. “ ते तेव्हा आमच्या लक्षात आले.

Team Lay Bhari

Recent Posts

पोपट सोबत असल्यास भविष्यवाणीला महत्व…; उमेश पाटील

मुंबईत लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. प्रचार करण्यासाठी अवघे दोन दिवस हातात…

2 mins ago

गटतट,वाद विवाद संपवून एकत्रित समाजासाठी लढा – मराठा आंदोलक नाना बच्छाव

काल दि १६ रोजी सकल मराठा समाजावतीने जाहीर लोकसभेतील वाजे, भगरे पाठिंबा पत्रानंतर त्या निर्णयाचे…

32 mins ago

तरूणाईच्या मनात कोण ?, नरेंद्र मोदी की विरोधक ?

लय भाराची टीम गेले काही दिवस नाशिक मतदार संघातील मतदारांचा आढावा घेत आहे(Who is in…

1 hour ago

कन्नमवारनगर समस्यांच्या जंजाळात, नागरिकांची लोकसभा उमेदवारांकडे याचना

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दीना पाटील, तर भाजपकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

2 hours ago

संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपानंतर निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून तपासणी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका…

3 hours ago

नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची असणारी परिस्थितीबाबत मनपाचा कानाडोळा

घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटने मागे असलेली पार्श्वभूमी व नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची (private hoarding)…

3 hours ago