राजकीय

राज ठाकरेंच्या वक्तव्यावर रोहित पवारांचं प्रत्युत्तर

टीम लय भारी

मुंबई : मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यात सुरु झालेला वाद तापला आहे. महाराष्ट्रातील जातीय द्वेषाला राष्ट्रवादी जबाबदार असल्याचे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे (Rohit Pawar responded to Raj Thackeray statement).

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर लगेच लोकांनी डोक्यावर घेतलेल्या या पक्षाला खाली आणायचे, असेल तर एकच पर्याय होता, तो म्हणजे जातीयवाद वाढवणे. म्हणून विरोधकांनी विकासाऐवजी जाती-धर्माच्या नावावर समाजात ताण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. असाच राज ठाकरेंच्या बोलण्याचा अर्थ निघतोय, असे रोहित पवार म्हणाले

रोहित पवारांकडून निर्मला सीतारामण यांना वाढदिवसाच्या खोचक शुभेच्छा !

रोहित पवार सरसावले विद्यार्थ्यांच्या मदतीला, बाळासाहेब थोरातांशी केली चर्चा

राज ठाकरे हे अद्भूत वक्तृत्व शैली असलेले नेते आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘लाव रे तो व्हिडीओ’ च्या वादळी सभांमुळे उडालेली धूळ डोळ्यात गेल्याने भाजपचे भले-भले नेते अजूनही डोळे चोळत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ असतो, असेही रोहित पवार म्हणाले.

राज ठाकरे काय म्हणाले?

अजूनही आपण जातीपातीमध्ये खितपत पडलो आहोत. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही निवडणुकीत भाषणे होतात तेव्हा सगळ्यांकडून सारखे रस्ते, पाणी, विज अशी तिच तिच आश्वासने दिली जात आहेत. तेव्हा एवढ्या वर्षात आपण काय केले हे शोधले पाहिजे. साधारणपणे आपण 90 चे शतक पहिले तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण 90 च्या नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला. मुख्य म्हणजे राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला, असे राज ठाकरे म्हणाले (The main thing is that it grew after the formation of NCP, said Raj Thackeray).

राष्ट्रवादीने हाती घेतले ‘भगवे’ राजकारण, आमदार रोहित पवारांचा पुढाकार

Caste politics increased after formation of NCP: Raj Thackeray

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘लाव रे तो व्हिडीओ’

मिटकरींचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

राज यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही हल्ला चढवला आहे. राष्ट्रवादी पक्षावर जातीयवादाचा आरोप कोण करतोय तर ज्यांनी महाराष्ट्रात दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय हा द्वेष निर्माण करण्याचे महापातक करून ‘राष्ट्रद्रोह’ केला ती व्यक्ती! अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणे आहे, अशा शब्दांत अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना खडेबोल सुनावले आहेत (In such words, Amol Mitkari has slammed Raj Thackeray).

Rasika Jadhav

Recent Posts

तिरुपती लाडू वादावरून ‘या’ अभिनेतावर चिडले पवन कल्याण

गेल्या काही दिवसांपासून तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाणाऱ्या लाडूवरून वाद सुरु आहे. आता या…

13 hours ago

इटलीमध्ये ‘वॉर 2’ ची शूटिंग सुरू, हृतिक-कियाराचा डान्स व्हिडिओ लीक

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आपल्या डांस आणि आपल्या फिटनेससाठी चर्चेत असतो. त्यांची जादू आजही प्रेक्षकांवर…

14 hours ago

रोज रात्री झोपण्यापूर्वी करा ‘हे’ सोपे व्यायाम, मांड्यांमधील चरबी होईल कमी

स्त्री-पुरुषांच्या शरीराचा वरचा भाग तंदुरुस्त असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं, पण मांड्यांवरची चरबी खूप वाढलेली असते…

15 hours ago

वजन कमी झाल्यानंतर त्वचा घट्ट होण्यासाठी करावे ‘हे’ सोपे उपाय

वजन कमी केल्याने अनेक आजारांचा धोका कमी होतो. वजन जेवढे संतुलित ठेवले जाते तेवढा आजारी…

16 hours ago

विराट कोहलीचे ‘हे’ कौशल्य पाहून व्हाल थक्क, पहा व्हिडिओ

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली हा जगातील महान फलंदाजांपैकी एक आहे.…

16 hours ago

कामरान अकमलने केली पीसीबीची कानउघाडणी, म्हणाला -‘बीसीसीआयकडून शिका’

पाकिस्तान क्रिकेटची स्थिती खूपच खराब आहे. पाकिस्तान कोणताही सामना जिंकू शकत नाही आहे, या उलट…

17 hours ago