राजकीय

चंद्रकांत पाटील यांचा जावईशोध, म्हणे ‘जम्मू – काश्मिर’ मध्ये ‘आदर्श लोकशाही’

टीम लय भारी

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा राजकीय शास्त्राचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ म्हणून सन्मान करायला हवा. कारण त्यांनी ‘आदर्श लोकशाही’चे उदाहरण जगासमोर ठेवले आहे (Chandrakant Patil should be honored as an international expert in political science).

लोकशाही कशी उभारली जाते, अन् नियंत्रणात ठेवली जाते याचे उदाहरण ‘जम्मू – काश्मिर’ असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

गोपीचंद पडळकर भाजप प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत, चंद्रकांत पाटलांची घेणार जागा !

चंद्रकांत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, भाजप – मनसेचे मैत्रीपर्व सुरू

गेल्या तीन – चार वर्षांपासून जम्मू – काश्मिरमध्ये लोकशाहीची पुरती वाट लागली आहे. लोकांनी निवडून दिलेली कोणतीही सत्ता जम्मू काश्मिरमध्ये कार्यरत नाही. लोकप्रतिनिधींना नजरकैदेत ठेवले जात आहे. इंटरनेट बंद केले जात आहे. लोकांना बोलू दिले जात नाही (People are not allowed to speak).

मोदी सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांना राष्ट्रद्रोही ठरवून त्यांच्यावर कधी पॅलेट गन, तर बंदुकीच्या गोळ्या झाडल्या जात आहेत.

चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील अचानक गेले फडणविसांच्या बंगल्यावर, दोन तास केली गहन चर्चा

36 FIRs filed so far against BJP’s Jan Ashirwad Yatra in Mumbai

संसदेमध्ये मिळालेल्या पाशवी बहुमताच्या आधारे जम्मू – काश्मिरचे तुकडे करण्यात आले. जम्मू – काश्मिर विधानसभेची मान्यता नसताना, स्थानिक जनतेचा विरोध असतानाही संसदेत जम्मू – काश्मिरच्या विरोधातील कायदे केले.

मोदी – शाह जोडगोळीने ‘जम्मू – काश्मिर’च्या जनतेचा अनन्वित छळ मांडला आहे. चंद्रकांत पाटील यांना मात्र जम्मू – काश्मिरमध्ये आदर्श लोकशाही दिसत आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना जागतिक किर्तीचे राज्यशास्त्राचे अभ्यासक म्हणून सन्मानित करायला हवे, असे बोलले जात आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

2 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

3 hours ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

5 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

8 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

8 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

11 hours ago