राजकीय

भाजपविरोधात लढण्यासाठी रोहित पवारांनी सुचवला हा प्लॅन

टीम लय भारी

अहमदनगर: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. महाविकास आघाडीतर्फे गुरुवारी मंत्रालयाजवळ महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन गांधीच्या शांततेच्या मार्गानं करण्यात आलं तरी यापुढं आक्रमक आंदोलन करण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळताना दिसत आहे.(Rohit Pawar to fight against BJP plan was suggested)

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्टवरून संकेत देत भाजपवर निशाणा साधला आहे. ‘राज्यघटनेनं दिलेला आवाज उठवण्याचा हक्क चिरडायचे प्रयत्न कपटी शत्रू करत असेल तर त्याविरोधात गांधीजींच्या सत्याच्या मार्गासोबतच भगतसिंग, राजगुरूंच्या आक्रमकतेच्या मार्गानंही लढावं लागेल,’ असं पवार यांनी म्हटलं आहे.

अडरवर्ल्डशी संबंध आणि मनी लाँड्रिंगशी संबधित प्रकरणात ईडीनं मलिक यांना अटक केली आहे. मात्र, हे सर्सार चुकीचे आहे. महाविकास आघाडीचे नेते एकवटले आहेत. मलिक यांच्या निमित्तानं केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून भाजपनं हा राजकीय डाव साधत आहे असेही ते म्हणाले. त्यामुळे आता या कारवाईला जशास तसं उत्तर द्यावं, अशी मागणीही पक्षातून केली जात आहे. तर दुसरीकडं भाजपकडून मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू असून त्यांच्या बचावासाठी पुढं आलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली जात आहे.

हे सुद्धा वाचा

नवाब मलिकांच्या घरासमोर कार्यकर्त्यांने लावला बॅनर; कुछ ही देर की….

देवेंद्र फडणवीस यांच्या तीन वर्षापूर्वीच्या तक्रारीचे काय? राष्ट्रवादी नेत्यांनी उभे केले नवे प्रश्न

भाजपाच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर निशाणा

Opposition Sharad Pawar play heats up after NCP projects party chief as PM material

या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी बिहारमधील मागील निवडणुकाचा संदर्भ देत आणि आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकाचा संबंध जोडत एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये पवार यांनी महटलं आहे, ‘बिहारच्या निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी पेटवण्यात आलेलं अभिनेत्याचं आत्महत्या प्रकरण निवडणूक संपताच शांत झालं, कदाचित २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत हे प्रकरण पुन्हा उकरून काढण्यात येईल.

त्याभवी महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने दबावतंत्राचं राजकारण करून उत्तर प्रदेशातील उर्वरित टप्प्यांसाठी व आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी हा भाजपचा प्रयत्न असावा, असे ते म्हणाले. आरोप करून रान उठवायचं, बदनामी करायची असे प्रयत्न जर ते करत असतील , तर त्याविरोधात गांधीजींच्या सत्याच्या मार्गासोबतच भगतसिंग, राजगुरूंच्या आक्रमकतेच्या व सत्याच्या मार्गाने आम्हालाही लढावं लागेल. असा इशारा देत भाजपवर टीका केली आहे.

Pratikesh Patil

Share
Published by
Pratikesh Patil

Recent Posts

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole )…

29 mins ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

47 mins ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

3 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

4 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

4 hours ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

4 hours ago