राजकीय

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना ठरवलं नामर्द

राज्यात आगामी लोकसभा निवडणुकांवरून सत्ताधारी आणि विरोधीपक्षांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. निवडणुका जसजशा येत आहेत त्याप्रमाणे पक्षांमधील टीकेचे बाण आणि त्याला प्रत्युत्तर पाहायला मिळत आहे. आज नवीन वर्ष २०२४ ची सुरूवात झाली आहे. वर्षाच्या सुरूवातीला शिवसेना खासदार ठाकरे गट संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना नामर्द म्हटलं आहे. इतके नामर्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देशामध्ये झाले नसल्याचं संजय राऊत यांनी सरकारचे वाभाडे काढले आहेत. ते इथवर न थांबता त्यांनी जे डरपोक लोकं होती. बेईमान होती. ते निघून गेले. जे एकनिष्ठ होते. ते आमच्यासोबत आणि शरद पवार यांच्यासोबतच्या नेत्यांना अमिष दाखवलं जात आहे. त्यांच्यावर दबाव आणला जात असून जे आता आमच्यासोबत आहेत ते निष्ठावान आणि मर्द लोक आहेत, असं राऊत म्हणाले आहेत.

हौशे-नौशे-गौशे तोंडाला कुलुप लावून गप्प का?

महाराष्ट्रावर दिल्लीतून आक्रमण होत आहे. राज्यतील उद्योग पळवले जात आहेत. रोजगार पळवला जात आहे. महाराष्ट्राचा पदोपदी अपमान केला जात आहे. असं असताना काही हौशे-नौशे-गौशे तोंडाला कुलुप लावून गप्प का बसले? असा सवाल आता संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे त्यांना आमच्यावर बोलण्याचा अधिकार नसल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. इतके नामर्द सरकार आणि नामर्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देशामध्ये तयार झाल्याचं पाहायला मिळालं नसल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी राज्यातील प्रकल्पाबाबतही शिंदे सरकारला सुनावले आहे.

हे ही वाचा

रामायणातील ‘लक्ष्मण’ रूसला

विक्रोळीत महात्मा ज्योतिबा फुले रूग्णालयाचा पुनर्विकास टांगणीला

मिशिगन-मार्सल फॅमिली स्कूल ऑफ एज्युकेशनच्या संयुक्त विद्यामाने भारतीय शिक्षक आणि शालेय परिषद

प्रकल्पाबाबत संजय राऊत आक्रमक

टेस्ला प्रकल्प, डायमंड मार्केट गुजरातला नेण्यात आलं, यावर आता संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर प्रहार केला आहे. टेस्ला प्रकल्प, डायमंड मार्केट, पाणबुडी प्रकल्प असे अनेक प्रकल्प डोळ्यासमोर घेऊन जात आहेत. हे सरकार एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री तोंडावर कापट घालून बसले आहेत. इतकं नामर्द सरकार या महाराष्ट्रामध्ये कधी आलं नव्हतं. इतिहासात आणि भविष्यात कधी येणार नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर हल्ला चढवला आहे.  अशातच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील सोडलं नाही.

संजय राऊत अजित पवारांवर आक्रमक

सोम्या आणि गोम्याच्या प्रश्नावर मी बोलत नाही असं म्हणत अजित पवार यांनी टीका केली. यावर आता राऊत यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार करत त्यांचे सोम्या गोम्या दिल्लीमध्ये आहेत. ज्यांनी गुलामी पत्करली जे डरपोक आहेत. त्यांनी आमच्यावर बोलू नये आणि याच्यापेक्षा मला जास्त बोलण्याची गरज नाही . सोम्या गोम्या कोण आहेत? २०२४ ला कळेल, असं म्हणत संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केला आहे.

 

टीम लय भारी

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

3 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

5 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

7 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

9 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

10 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

10 hours ago