25 C
Mumbai
Sunday, March 3, 2024
Homeमहाराष्ट्र'२०२३ मावळताना शिवसेनेचा सूर्य तेजानं दिसतोय', मावळ मतदारसंघाची जबाबदारी 'या' नेत्याकडे

‘२०२३ मावळताना शिवसेनेचा सूर्य तेजानं दिसतोय’, मावळ मतदारसंघाची जबाबदारी ‘या’ नेत्याकडे

आगमी लोकसभा निवडणुकांवरून राज्यात हिवाळ्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता आगामी लोकसभेमुळे मोर्चे, यात्रा काढणं सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातही दोन गट पडल्यानं सर्वच अवघड होऊन बसलं आहे. यामुळे मतदार नेमकं कोणाला मत देणार याबाबतीत गोंधळ उडाला आहे. मात्र अशातच आता अजित पवार गटाचे नेते संजोग वाघिरे यांनी शिवबंधन बांधलं आहे. ठाकरे गटात पक्षप्रवेशानंतर मावळ मतदारसंघाची जबाबदारी सोपवल्याची माहिती समोर येत आहे. पक्षप्रवेशानंतर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी यासंबंधीचे सूचक वक्तव्य देखील केलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

‘संजोग वाघिरे हे शिवसेनेमध्ये आले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधनामध्ये बांधून घेतलं आहे. आम्ही शिवसैनिक भावूक असतो पण आता आपल्याला लढायचं आहे. तुमच्याकडे जबाबदारी आहे ती म्हणजे मावळ शिवसेनेकडे खेचून आणण्याची. २०२३ मावळताना शिवसेनेचा सूर्य तेजाने दिसतोय’.

हे ही वाचा

आयपीएल खेळणारा नेपाळचा पहिला क्रिकेटपटू वादाच्या भोवऱ्यात, बलात्काराचा गंभीर आरोप

‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटात थ्री इडियट्समधील चतुरचं पदार्पण

ऋषभ पंतसाठी एका वर्षांआधी आजचा दिवस ठरला दैवबलवत्तर

त्यांनी गद्दारी केली

दरम्यान मुंबईत मातोश्रीवर झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी बंड पुकारलेल्या आमदारांवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, काहीजण भावूक आहेत ते भगव्यासह आहेत. मावळ मतदारसंघ निर्माण झाला तेव्हापासून शिवसेना जिंकत आली आहे. अगदी आधी बाबरसाहेब होते तेव्हापासून. आपल्याकडे उमेद्वार नव्हता असं नाही. पण त्यांनी गद्दारी केली असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

स्वाभिमानी आणि गद्दार यांच्यात हाच फरक

शिवसेनेमध्ये काल जळगावातूनही अनेकांनी प्रवेश केला आहे. जिकडं सत्ता तिकडं जाणारे हे गद्दार आहेत. तर पक्षासोबत आहेत ते स्वाभिमानी असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

कोण आहेत संजोग वाघिरे?

संजोग वाघिरे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांनी माजी महापौर म्हणून पिंपरी-चिंचवडमध्ये काम केलं आहे. वाघेरे यांनी मावळ मतदारसंघात दोन वेळा मतदानासाठी तयारी केली होती, मात्र त्यांना तिकिट दिलं नसल्याचं वाघिरे म्हणाले आहेत. यामुळे आता त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश करत मावळ मतदारसंघाची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतली असल्याची माहिती समोर येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी