राजकीय

आम्हाला दिलेल्या प्रत्येक त्रासाची किंमत भाजपला चुकवावी लागेल; संजय राऊत संतापले

टीम लय भारी

मुंबई: महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांचा अमर्याद गैरवापर सुरु आहे. या तपास यंत्रणांच्या मदतीने ज्या पद्धतीने त्रास दिला जात आहे त्या प्रत्येक त्रासाची किंमत भाजपला चुकवावी लागेल, असा इशारा शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. तसंच, शरद पवार जे बोलले आहेत ते त्यांची चिड संताप वेदना आहे(Sanjay Raut is angry BJP will have to pay the price for every trouble given to us)

ही सगळ्यांचीच वेदना आहे. आमच्या मनात एक राग आहे. महाराष्ट्रात आम्ही जे महाविकास आघाडी सरकार बनवलं ते याच चिडीतून बनवलं, असं राऊत म्हणाले.

Sanjay Raut : तर ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारणार; संजय राऊतांचा जाहीर इशारा

Sanjay Raut : ईडीचा नवा खुलासा:प्रवीण राउत-संजय राउत यांच्या पत्नी पार्टनर! वर्षा राउत यांना 55 लाखांचे बिनव्याजी कर्जही दिले, ED चा गंभीर आरोप

संजय राऊत यांनी मुंबईत गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. सत्तेसाठी काहीही करायचं. केंद्रीय तपास यंत्रणांचा जो अमर्याद गैरवापर सुरु आहे, खासकरुन महाराष्ट्रात, हे लोकशाही संकेताला धरुन नाहीत.

शरद पवारांनी सांगितलं ना याची किंमत चुकवावी लागेल. नक्कीच याची किंमत चुकवावी लागेल. या देशाची जनता कधीच कोणाला माफ करत नाही. इंदीराजींच्या काळात देखील पाहिलं.

MNS questions to Sanjay Raut : अग्रलेख लिहिण्यापलीकडे काय केलंत? मनसेचा संजय राऊतांना सवाल

Our people are tortured by Central agencies: Sanjay Raut

आम्ही सगळेच प्रमुख लोकं, पवार कुटुंबीय, अनिल देशमुख तुरुंगात आहेत, छगन भुजबळांना क्लीन चिट मिळाली आहे. मग त्यांनी इतका काळ तुरुंगात घालवाल त्याचं काय? त्याची भरपाई कोण करणार? असा सवाल राऊत यांनी केला.

आमचे अनिल परब आहेत, प्रताप सरनाईक आहेत. आम्हीच तुम्हाला दिसतोय का? तुमच्या पक्षामध्ये, तुमचा चमचा मंडळ आहे. त्यामध्ये सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत? असा सवाल करत आम्ही तुम्हाला घाबरत नाही, कारण आमचं काहीच पाप नाही, असं रोखठोकपणे राऊत यांनी सांगितलं. तुम्ही पापी लोकं, बुरखे घालून फिरता इथे.

आमच्यावर आरोप करताय, चिखलफेक करताय. याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. मी याआधी देखील म्हटलं आहे, आम्ही जो त्रास भोगलेला आहे त्या प्रत्येक सेकंदाची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. नियती कुणाला माफ करत नाही, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला.

परमबीर सिंह यांना केंद्राने पळवून लावलं

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना न्यायालयाने फरार घओषित केलं आहे. यावर बोलताना राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला. ज्या व्यक्तीने राज्याच्या गृहमंत्र्यावर भन्नाट आरोप केले आणि आज तो बेपत्ता आहे, त्याला फरार घोषित करावा लागलं. तो कुठे आहे कुणाला माहित नाही.

ते देशातून पळून गेले असतील तर केंद्रीय सरकारच्या मदतीशिवाय कोणीही देशाच्या सीमा, मग हवाई, समुद्र मार्ग किंवा रस्त्याच्या सीमा पार करु शकत नाही. तुम्ही आमच्यावर आरोप करुन परमबीर सिंह यांना पळवून लावलं आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केला.

कीर्ती घाग

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

6 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

7 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

8 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

8 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

9 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

9 hours ago